vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक – २०२६ निकाल घोषित

नवी मुंबई शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक – २०२६ निकाल घोषित

 

          नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिका शहर पथवक्रेता समितीच्या पथवक्रेता प्रवर्गातील आठ सदस्यांच्या निवडणुकीसाठी घोषित झालेल्या कार्यक्रमानुसार दिनांक 04 जून, 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी 4 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या तर सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या दोन जागांसाठी एकूण 14 उमेदवार रिंगणात होते.

          तत्पूर्वी अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक आणि विकलांग या प्रवर्गातील जागांसाठी केवळ एकच अर्ज वैध ठरल्याने त्या – त्या प्रवर्गाचे सदस्य बिनविरोध निवडून आले असून अनुसूचित जमाती प्रवर्गात एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याने सदरची जागा रिक्त राहिली आहे.

          तीन जागांसाठी नवी मुंबई शहरात विभागनिहाय एकूण 9 मतदान केंद्रांवर गुरुवार, दिनांक 04 जून, 2026 रोजी, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.00 या वेळात मतदान झाले. एकूण 7009 बायोमॅट्रीक सर्वेक्षण झालेल्या नोंदीत मतदारांपैकी 3408 इतक्या पथविक्रेत्यांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 48.62 इतकी आहे.

          मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर येथील मुख्यालयात सायं. 8.00 ते रात्रौ 12.00 या वेळात मतमोजणी पार पडली. घोषित निकालानुसार सदर निवडणुकीचा प्रवर्गनिहाय निकाल खालीलप्रमाणे :-

 

* अनुसूचित जाती (महिला) – श्रीम, ज्योती दिपक पोटे – बिनविरोध निवड

 

* अनुसूचित जमाती सर्वसाधारण – निरंक / रिक्त

 

* इतर मागास प्रवर्ग (महिला) – श्रीम.धनश्री दिपक पाटील – बिनविरोध निवड

 

* अल्पसंख्यांक सर्वसाधारण – श्री.सय्यद मस्तान फकिरा – बिनविरोध निवड

 

* विकलांग/ दिव्यांग सर्वसाधारण – श्री. कृष्णा पांडुरंग खरात – बिनविरोध निवड

* सर्वसाधारण महिला राखीव – श्रीम, रेखा अनिल चिकणे – 121 मतांनी विजयी

* सर्वसाधारण – श्री. अनिल गेणू चिकणे – 257 मतांनी विजयी

* सर्वसाधारण – श्री. श्रीकांत भगवान भोईर – 181 मतांनी विजयी

सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अजय साबळे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.0000

संबंधित पोस्ट

पीक कर्ज वितरण आणि स्वयंरोजगारांना अर्थसहय्य यासाठी सकारात्मक काम करा**जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे बँकांना निर्देश*

vishwatmaklokswamivarta

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार

मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ राबवणार; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचा समारोप; शालेय शिक्षणमंत्री दोन्ही दिवस उपस्थित शालेय शिक्षण दर्जेदार पद्धतीने देण्यासह विविध विषयांवर महत्त्वपूर्व चर्चा

vishwatmaklokswamivarta

कोलंबियामधील बुकारामंगा इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारताच्या पाचही विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्ण पदके

नवतेजस्विनी योजना जिल्हा सल्लागार समिती बैठक-महिलांच्या स्वयंरोजगाराला चालना द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta