vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचयतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचयतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

लातूर, प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाच्या 26 मे, 2026 च्या आदेशन्वये सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, जळकोट, उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ, निलंगा, औसा या तालुक्यातील एकूण 414 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार सोमवार, 8 जून, 2026 रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येईल. शुकवार, 12 जून, 2026 रोजी विशेष ग्रामसभा बोलावून, तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित होईल. बुधवार, 17 जून ,2026 रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला जिल्हाधिकारी यांनी मान्यता देतील. शुक्रवार, 19 जून, 2026 रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द केले जाईल. दि. 19 ते 25 जून, 2026 या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करता येईल.

शुकवार, 3 जुलै, 2026 रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेवून अभिप्राय देणे, बुधवार, 8 जुलै, 2026 रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेवून अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देण्याची कार्यवाही केली जाईल. 10 जुलै, 2026 रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ) व्यापक प्रसिध्दी देण्यात येईल, असे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सायली ठाकूर यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात, ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर…

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले महिलांच्या स्वप्नांना बळ,- सावळीत महिला गृहउद्योग केंद्र, स्वयंरोजगार विक्री केंद्राचे लोकार्पण- पौष्टिक लाडुंची खरेदी करून महिलांना स्वतः केले वाटप – जिल्ह्यात 90 स्वयंरोजगार विक्री केंद्रे, डीपीसीतून अडीच कोटींचा निधी 32 महिला गृहउद्योग केंद्रांसाठी डीपीसीतून अडीच कोटींचा निधी…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यकØ राज्य निवडणूक आयोगाचे आदेश जारीØ जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत…

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (MCED) तर्फे ‘इम्पोर्ट एक्सपोर्ट’ प्रशिक्षण

बीकेसीतील तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र प्रदान महाराष्ट्राची आर्थिक केंद्र म्हणून दमदार वाटचाल; १५ हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती शक्य