vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- दि. 8 मार्च, 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महापालिका क्षेत्रातील “विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना पुरस्कार” वितरण तसेच महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था यांनी उत्पादित केलेल्या साहीत्याची विक्री करण्यासाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

          यामध्ये नमुंमपा कार्यक्षेत्रातील महिलांकरीता दि. 04/03/2026 ते दि. 06/03/2026 या कालावधीत समुह गायन स्पर्धा, महिला भजनी मंडळ भजन स्पर्धा, लहान व्हिडीओ (Short Video) स्पर्धा – (विषय : महिला सुरक्षितता विषयक जनजागृती, पर्यावरण, शिक्षण), समुह नृत्य स्पर्धा (विषय – कोळीनृत्य), समुह नाटिका स्पर्धा आणि मंगळागौर स्पर्धा अशा 6 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

          या स्पर्धांची प्राथमिक फेरी व अंतिम फेरी महात्मा फुले स्मृती भवन, भूखंड क्र.12/13, तिसरा मजला, सेक्टर-3, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी घेण्यात येईल. तसेच दि. 8 मार्च, 2026 रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या दिवशी या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा तसेच पुरस्कार वितरण समारंभ विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी या ठिकाणी संपन्न होणार आहे.      या स्पर्धांमधील सहभाग, पुरस्कारासाठीची नामांकने व वस्तु विक्री स्टॉल करिता आवश्यक अर्ज सर्व विभाग कार्यालये तसेच समाजविकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. 11, सी.बी.डी., बेलापूर येथे उपलब्ध आहेत.

          या स्पर्धांमधील सहभागाकरीता अर्ज करण्याचा अंतिम दि. 02 मार्च 2026 असून पुरस्कार व वस्तु विक्री स्टॉल करीता अर्ज करण्याचा अंतिम दि. 04 मार्च 2026 असणार आहे.

          विशेष आकर्षण म्हणजे दि. 8 मार्च, 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिलांकरीता ‘पैठणी लकी ड्रॉ’ स्पर्धा कार्यक्रमाचे ठिकाणी घेण्यात येणार आहे.

           पुरस्कार नामांकन व विक्री स्टॉल बाबतची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी व शर्ती महानगरपालिकेची सर्व विभाग कार्यालये तसेच समाजविकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. 11, सी.बी.डी., बेलापूर येथे शासकीय सुट्टया वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील तसेच अर्जही स्विकारले जातील.

            उक्त विक्री स्टॉल उपलब्ध करुन घेण्यासाठी फक्त नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणा-या महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था अर्ज करू शकतात. दाखल केलेल्या अर्जांपैकी एक अथवा सर्व अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार नमुंमपा आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांनी राखून ठेवला आहे याची नोंद घेण्यात यावी. अधिक माहितीसाठी विभागनिहाय संपर्कध्वनी व समन्वयक –  श्री. मिथून म्हात्रे – 9867231403, बेलापूर.श्रीम. प्रियंका पाटील – 9082311440, नेरुळ.श्री. सुंदर परदेशी – 9594841666, वाशी व तुर्भे.श्री. दादासाहेब भोसले – 9372106976, कोपरखैरणे व घणसोली.श्री. दशरथ गंभिरे – 9702309054, ऐरोली व दिघा.     तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व इतर उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

मनोरा आमदार निवाससाठी ५५.५० कोटींच्या विकास शुल्कासह वाढीव खर्चाला मंजुरी फेब्रुवारी २०२८ पर्यंत भव्य आणि सुसज्ज ४२ मजली इमारत; मिनी थिएटर, जिम आणि आधुनिक सुविधांचा समावेश

धारावीतील धडाडीच्या महिला कार्यकर्त्या श्रीमती अनिताताई डोईफोडे यांची भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा मुंबई सचिव पदी नियुक्ती

ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी ठाण्यातली नियोजित पाणी कपात दिवाळीनिमित्त रद्द केली आहे.

vishwatmaklokswamivarta

डोलाया सागरी किनारा सखोल स्वच्छता मोहीमेतून जागतिक पर्यावरण दिन साजरा

बोले तैसा चाले…!अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा१३३ कोटींच्या भव्य स्मारकास मंजुरी; डॉ. संजय लाखेपाटील यांच्या पाठपुराव्याला यश..

माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा गौरव !पर्यावरणमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार