vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बिडी कामगारांच्या किमान वेतनवाढीबाबत उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी – मंत्री ॲड. आकाश फुंडकर

बिडी कामगारांच्या किमान वेतनवाढीबाबत उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी – मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई, प्रतिनिधी बिडी कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे. कामगारांचा उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून असल्याने त्यांना योग्य न्याय मिळावा, तसेच त्यांच्या किमान वेतनात वाढ करण्याबाबत या क्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी केले
बिडी कामगारांच्या किमान वेतन व महागाई भत्त्याच्या प्रश्नासंदर्भात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बीकेसी येथील कामगार भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस कामगार विभागाचे उपसचिव दिपक पोकळे, तसेच संबंधित अधिकारी, मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी बिडी कामगारांना किमान वेतनासोबत महागाई भत्ता देण्यात यावा, अशी मागणी केल
मालक प्रतिनिधींनी या संदर्भातील आपले सविस्तर निवेदन शासनाकडे सादर करावे, असे सांगत कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, प्राप्त निवेदनाचा विचार करून शासनस्तरावर पुढील निर्णय घेण्यात येईल. बिडी कामगारांच्या किमान वेतनाबाबत सर्व संबंधित घटकांच्या भूमिका विचारात घेऊन न्याय्य व समतोल निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. असेही ते म्हणाले.

 

0000

संबंधित पोस्ट

भाजपा जालना महानगर च्या वतीने महाप्रशिक्षण अभियान अंतर्गत निवासी प्रशिक्षण वर्ग संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हा वार्षिक योजना निधीतून पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर बांधलेल्या किल्ला भिंतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

आज वेव्हज् परिषदेच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 1 मे रोजी मुंबईत

जलपुनर्भरणासंदर्भात व्यापक जनजागृती करावी – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्‌घाटन

भूमि अभिलेखकडील अर्धन्यायिक प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालतीचे 26 सप्टेंबरला आयोजन

vishwatmaklokswamivarta

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद! सर्वांना ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच प्रवेश…