vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महानगरपालिका क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावी*कामगार उपायुक्तांचे आवाहन

महानगरपालिका क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावी*कामगार उपायुक्तांचे आवाहन

 

       अमरावती, प्रतिनिधी: आपल्या देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 अंतर्गत येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कामगार मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे आवाहन कामगार उप आयुक्त च. अ. राऊत यांनी केले आहे.

    लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार, मतदानाच्या दिवशी मतदारांना सुट्टी मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. मात्र, अनेक संस्था किंवा आस्थापना आपल्या कामगारांना सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. ही बाब लोकशाहीसाठी घातक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने यावेळी कडक आदेश निर्गमित केले आहेत.

     हे आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी कंपन्या, कारखाने, सर्व प्रकारची दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स आणि मॉल्स यांना लागू राहतील. जे कामगार निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत आहेत, पण त्यांचे नाव मतदार यादीत आहे, त्यांनाही ही सुट्टी लागू असेल. अपवादात्मक परिस्थितीत, जिथे कामाच्या स्वरूपामुळे पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नाही, अशा ठिकाणी कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे मालकांना बंधनकारक असेल. जर कोणत्याही मालकाने किंवा व्यवस्थापनाने या सूचनांचे पालन केले नाही किंवा कामगारांना मतदानापासून वंचित ठेवले, तर तक्रार प्राप्त होताच संबंधित आस्थापनेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी या सवलतीचा लाभ घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

अनधिकृत शाळांपासून सावध राहा, फक्त शासन मान्यताप्राप्त शाळांमध्येच प्रवेश घ्या- शिक्षणाधिकारी प्राथमिक), बाळासाहेब राक्षे”

ऑटोरिक्षा चालकांविरुध्द ऑनलाईन तक्रारीकरिता व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध..

vishwatmaklokswamivarta

जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र #चौंडी येथे ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ या जलजागृती यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद सभापती सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत – पालकमंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट योजना) अर्ज भरण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विधानपरिषदेत निरोप..