vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

बुलडाणा, प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालविण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदुरा (जि. बुलढाणा) येथे शैक्षणिक वर्ष 2025-2026 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आरक्षित टक्केवारीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अपंग, अनाथ इत्यादी घटकांतील विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेस पात्रता आहे. नांदुरा नगरपरिषद हद्दीतील शाळा, विद्यालये व महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

प्रवेश अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना https://hmas.mahait.org या अधिकृत वेबसाईटचा वापर करावा. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच अधिक माहितीसाठी संपर्क: 8975778949 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा किंवा वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन गृहपाल एस. व्ही. सोनटक्के यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज-पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांची माहिती

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या एआय परिषदेत ब्रिजेश सिंह यांनी पत्रकारितेतील एआय वापरावर केले मार्गदर्शन पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, एआयच्या युगातही पत्रकारितेची विश्वासार्हता अधिक महत्त्वाची..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवा गुणवत्तेमध्ये सुधारणा व्हावी हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून-डीप क्लिनींगव्दारे हवा गुणवत्ता सुधारणेवर भर…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे सन २०२९ पर्यंत समूळ उच्चाटन नशामुक्त भारत अभियानात पुढचे पाऊल, सर्वसमावेशक धोरण.. आणि मंत्रिमंडळ निर्णय

vishwatmaklokswamivarta

संविधान बदलण्याचे नरेटिव्ह पसरiवणारेच संविधान विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta