vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मागासवर्गीय मुलींसाठी मोताळा येथील वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

मागासवर्गीय मुलींसाठी मोताळा येथील वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

 

बुलडाणा, प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलडाणा जिल्हा अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मोताळा येथील शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही प्रवेश प्रक्रिया मागासवर्गीय प्रवर्गनिहाय आरक्षण टक्केवारीनुसार असेल. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील मुलींना प्रवेशासाठी पात्रता दिली जाणार आहे.

मोताळा नगर पंचायत हद्दीतील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व महाविद्यालये येथे शिक्षण घेणाऱ्या आणि अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना अर्ज भरता येणार आहे.

प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा असून, त्यासाठी https://hmas.mahait.org या लिंकचा वापर करावा. यासंदर्भात वसतिगृहाचे गृहपाल अरुण इंगळे यांनी जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी 9423761403 क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट वसतिगृहाला भेट द्यावी.

00000

संबंधित पोस्ट

नवरात्रोत्सवनिमित्त महिला सबलीकरणासाठी विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभार्थींची इतरांसाठी प्रेरणादायी विशेष लेखमालिका क्रमश:

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाज जालना जिल्हा यांचा आक्रोश मोर्चा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्या-अंडी नष्ट, परिसरात हाय अलर्ट..

vishwatmaklokswamivarta

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळी सी फेसवर ‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ला उत्स्फूर्त प्रतिसाद