vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाज जालना जिल्हा यांचा आक्रोश मोर्चा

विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाज जालना जिल्हा यांचा आक्रोश मोर्चा

 

जालना प्रतिनिधी सकल मातंग समाज जालना जिल्हा यांचा आक्रोश मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या पुतळ्यापासून गांधीचे मन कचेर रोड उड्डाणपूल नूतन वसाहत सभेत रूपांतर झाले यावेळी श्रीकृष्ण पांडव अशोक साबळे निखिल पगारे संदीप खरात सुनील रतन मार्केट डावी गायकवाड संदीप साबळे संतोष तुपसुंदर अंकुश राजगिरे किरण शिरसाट राम सुतार पीटर खंदारे प्रमोद खरात अर्जुन धाकतोडे रवी पांडव विकी हिवाळे सचिन घोडे सचिन लोंढे श्याम सराटे रवी पाखरे संतोष निकाळजे यावेळी उपस्थित होते छायाचित्र किरण खानापुरे

विविध मागण्यांच्या अनुषंगाने तसेच विकास लोंढे खून प्रकरणातील आरोपींना फाशीची िशक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने जालना शहरात मंगळवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरु होऊन गांधी चमन, कचेरी रोड, उड्डाणपुल मार्गे नुतन वसाहत येथे आला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

विकास लोंढे याचा खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, हा खून खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा, या खून प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग तरुणाबाबत जी घटना घडली, त्यात कारवाई करावी, जालना जिल्ह्यात दलीत समाजाच्या जागांवर काही ठरावी गुंडांनी अतिक्रमण केले आहे, त्याबाबत कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाला श्रीकृष्ण पांडव, अशोक साबळे, निखिल पगारे, संदीप खरात आदींची उपस्थिती होती. या आंदोलनाला आमदार अर्जून खोतकर यांनीही भेट दिली आहे.

संबंधित पोस्ट

रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्यासाठी विधि व न्याय विभागाचे मार्गदर्शन घ्यावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा

सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा उत्साहातमाजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सपत्नीक सन्मान

vishwatmaklokswamivarta

नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे‘समता सप्ताह’ सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते कल्याणकारी योजनांचे लाभार्थ्यांना वितरण…

नमुंमपा आस्थापनेवर ‘गट – क’ मधील सरळसेवा पदभरती..

vishwatmaklokswamivarta