vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंधलेखन स्पर्धा जाहीर;२८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संस्थेकडे निबंध सादर करण्याचे आवाहन

कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंधलेखन स्पर्धा जाहीर;२८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संस्थेकडे निबंध सादर करण्याचे आवाहन

मुंबई,  प्रतिनिधी : भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा यांच्यातर्फे कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२५-२०२६ जाहीर करण्यात आली आहे. निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली असून निबंध कागदाच्या एकाच बाजूस टंकलिखित करून त्यावर केवळ टोपणनाव लिहावे. निबंधाच्या चार प्रती तयार करून २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संस्थेकडे सादर करावे, असे भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचे मानद सचिव विजय सतविर सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

या वर्षीच्या स्पर्धेसाठी १) कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग (Era of Artificial Intelligence), २) सोशल मीडिया : आव्हाने आणि संधी (Social Media: Challenges and Opportunities), ३) नागरिकांचे जीवन सुलभ करणे (Ease of Living) हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.

स्पर्धेतील निबंध इंग्रजी किंवा मराठी भाषेत सादर करता येतील. निबंध तीन हजार शब्दांपेक्षा कमी आणि पाच हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा. निबंध विषयानुसार विश्लेषणात्मक, संशोधनपर आणि पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे.

स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा ओळख नमूद करू नये. स्पर्धकाचे नाव, टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल पत्ता स्वतंत्र लिफाफ्यात नमूद करून पाठवावा.स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, अधिक माहिती आणि नियमावलीसाठी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.iipamrb.org.in भेट देता येईल. असेही मानद अध्यक्ष, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा,मंत्रालय मुंबई यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

टास्क फोर्सच्या अहवालानंतर सोशल मीडिया वापरावरील नियंत्रणाबाबत धोरण ठरणार- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

अधिकारी व कर्मचारी यांनी AI तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई

vishwatmaklokswamivarta

सुरक्षित इंटरनेट वापराबाबत कार्यशाळा संपन्नपैसे मागणाऱ्या अज्ञात नंबरवरील कॉल्सला उत्तर देऊ नका – जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

जागतिक ग्राहक दिनाचे 17 मार्च रोजी आयोजन

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षणउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण..

तंत्र शिक्षणातील विशेष योगदान व कामगिरीसाठीडॉ. विनोद मोहितकर यांचा ‘एआयसीटीई’कडून मानद फेलोशिपने सन्मान..

vishwatmaklokswamivarta