vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त पी.एन.पी. कॉलेज, अलिबाग येथे  विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रम संपन्न

सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त पी.एन.पी. कॉलेज, अलिबाग येथे  विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रम संपन्न

 रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या वतीने सुरक्षित इंटरनेट दिवस निमित्त (09 फेब्रुवारी रोजी) पी.एन.पी. कॉलेज, अलिबाग येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला.

या व्याख्यान कार्यक्रमात दैनंदिन जीवनात इंटरनेटचा सुरक्षित वापर, सायबर फसवणूक, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, ऑनलाईन व्यवहारातील सुरक्षितता तसेच वैयक्तिक माहितीचे संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी निलेश लांडगे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सायबर सुरक्षेबाबत सखोल माहिती देत डिजिटल युगात जागरूक राहण्याचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानातून सायबर विश्वातील संभाव्य धोके व त्यावरील उपाययोजना समजून घेतल्या.

या कार्यक्रमास पी.एन.पी. कॉलेजचे प्राचार्य श्री. पोटे यांच्यासह राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे अभियंते निखिल पडते, विराज चांगे व योगेश कराड उपस्थित होते.

0000000

संबंधित पोस्ट

कृषीप्रधान भारतासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल- कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रभावी शस्त्र;    चॅटजीपीटी म्हणजे एआय नव्हे – सीईओ आनंद माहुरकर

vishwatmaklokswamivarta

‘आयुष’ची बहुभाषिक डिजिटल सेवा बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि डिजिटल इंडिया भाषिणी विभाग यांच्यात सामंजस्य करार

भूमित्र’ चॅटबॉटच्या माध्यमातून महसूल सेवा लोकांपर्यंत जलदगतीने पोहोचतील लोकार्पणप्रसंगी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

डिजीटल आर्थिक व्यवहाराबाबत जनजागृती

मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा -मुख्यमंत्री ,महाराष्ट्राला जीसीसी हब बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार…

vishwatmaklokswamivarta

बेपत्ता व्यक्ती आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘रेड्स’ AI ॲपची राष्ट्रीय स्तरावर दखल