vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

टेक-वारी २.०’ प्रशिक्षण उपक्रमांतर्गत ‘डिजिटल युगातील डेटा सुरक्षेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन

टेक-वारी २.०’ प्रशिक्षण उपक्रमांतर्गत ‘डिजिटल युगातील डेटा सुरक्षेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन

राज्य प्रतिनिधी -कृत्रिमबुद्धिमत्ता (#एआय), सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे वैयक्तिक #डेटा चे महत्त्व प्रचंड वाढले आहे. चुकीच्या हातात गेलेला डेटा व्यक्ती, समाज आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो.

#कृत्रिमबुद्धिमत्ता (#एआय), सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे वैयक्तिक #डेटा चे महत्त्व प्रचंड वाढले आहे. चुकीच्या हातात गेलेला डेटा व्यक्ती, समाज आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो. सायबर गुन्हे, डिजिटल अटक, फसवणूक, तसेच डेटा लीकच्या घटनांमुळे याची गंभीरता अधिक असल्याने डिजिटल युगात डेटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयातील वकील खुशबू जैन यांनी ‘टेक-वारी २.०’ प्रशिक्षण उपक्रमांतर्गत ‘डिजिटल युगातील डेटा सुरक्षेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.

‘डेटा’ हा व्यक्तीची मालमत्ता आहे आणि त्यावर पूर्ण नियंत्रण व्यक्तीचेच असायला हवा, कोणतीही संस्था किंवा कंपनी नागरिकांची स्पष्ट आणि समजण्यास सोपी संमती घेतल्याशिवाय डेटा वापरू शकत नाही, असेही खुशबू जैन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘डेटा प्रिन्सिपल’ आणि ‘डेटा फिड्युशरी’ या दुहेरी भूमिकेत काम करताना पारदर्शकता, जबाबदारी आणि सुरक्षिततेची तत्त्वे पाळण्याचे आवाहन केले. डेटा गळती किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास मोठ्या प्रमाणावर दंडाची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला विविध विभागांतील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्रादरम्यान उपस्थितांनी डेटा संरक्षणाशी संबंधित प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.

0000

संबंधित पोस्ट

सायबर सुरक्षेबाबत जागरूकता लक्झरी नव्हे तर गरज- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंधलेखन स्पर्धा जाहीर;२८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संस्थेकडे निबंध सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा पारदर्शकता आणि डिजिटल तंत्रज्ञानावर भर;लाभार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध.

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित,जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये पॅनेल चर्चेत डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर चर्चा..

जिल्ह्यात ‘डिजिटल जनगणने’ ची तयारी सुरू६४ फिल्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाने मोहीम सुरू

vishwatmaklokswamivarta

इ टी एज एससीएम फेस्ट 2025: ‘संकल्प से सिद्धि इन्फ्रास्ट्रक्चर ऑनर’ ने आयडब्ल्यूएआयच्या जल मार्ग विकास प्रकल्पाला गौरव