vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात 7 मे रोजी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची  

जिल्ह्यात 7 मे रोजी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची                                                                    राज्य प्रतिनिधी : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 06 मे रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 7 मे 2026 या एक दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले                                                                                या गोष्टी करा :विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका:

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात चार हजार कोटींची अधिकची गुंतवणू उद्योजकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे- पालकमंत्री शंभूराज देसाई

३ महिने पाठपुरावा करूनही ‘एस्.टी.’चे ७२% संपर्क क्रमांक ‘डेड’ आता आश्वासन नको; संपर्क यंत्रणा सुरू करा -‘सुराज्य अभियान’मुंबई आणि नवी मुंबई येथे परिवहन महामंडळाना निवेदन..

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्या पाठपुराव्यामुळे दशकांपासूनचा विजेचा अडथळा दुरमहावितरण विभागाकडून विविध ठिकाणी नवीन पोल बसवले विजेच्या तारांना सुरक्षित उंची देत बससेवेचा मार्ग मोकळा

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदेड क्षेत्रीय प्रचार समितीकडून व्यापक जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta

पारसी टेकडी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणार          -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,केशवसृष्टी इरकॉन घनवनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

कुटुंब’संस्था मजबूत करणे हाच मानस-रूपाली चाकणकर जनसुनावणीत १५२ तक्रारी निकाली

vishwatmaklokswamivarta