vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात चार हजार कोटींची अधिकची गुंतवणू उद्योजकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे- पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यात चार हजार कोटींची अधिकची गुंतवणू उद्योजकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे- पालकमंत्री शंभूराज देसाई

 

सातारा द प्रतिनिधी:- सातारा जिल्हा हा उद्योजकांसाठी सुरक्षित आहे. तरी उद्योजकांनी सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी. त्यांच्या पाठीशी शासनासह प्रशासन खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली

हॉटेल फर्न रेसिडेन्सी, सातारा येथे पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, जिल्हा उ‌द्योग केंद्राचे सहायक आयुक्त उमेशचंद्र दंडगव्हाळ यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात नवनवीन उद्योग यावे यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सातारा, तासवडे, खंडाळा या ठिकाणी मोठे उद्योग आहेत. येथील उद्योगजकांना काही अडचणी असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा

नागरिकांच्या हाताला काम देणे हे शासनाबरोबरच प्रशासनाचे ध्येय आहे. उद्योजकांनी सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी उद्योजकांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

0000

 

संबंधित पोस्ट

७.३७ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात-दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)-राज्यातील ५६० गोशाळांच्या बँक खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण…

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन,शेतकऱ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक- ॲड. निलेश हेलोंडे पाटील

vishwatmaklokswamivarta

मुंबई जिल्ह्यात ६८६ रुग्णांना सुमारे ६.५५ कोटींची मदत· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी दक्षता व फिरत्या पथकांचा पहारा