vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्या पाठपुराव्यामुळे दशकांपासूनचा विजेचा अडथळा दुरमहावितरण विभागाकडून विविध ठिकाणी नवीन पोल बसवले विजेच्या तारांना सुरक्षित उंची देत बससेवेचा मार्ग मोकळा

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्या पाठपुराव्यामुळे दशकांपासूनचा विजेचा अडथळा दुरमहावितरण विभागाकडून विविध ठिकाणी नवीन पोल बसवले विजेच्या तारांना सुरक्षित उंची देत बससेवेचा मार्ग मोकळा

भोकरदन, द(प्रतिनिधी)–छत्रपती संभाजीनगर ते माहोरा या महत्त्वाच्या बसमार्गावर खाली लोंब कळणार्‍या विजेच्या तारांमुळे बससेवा सुरु करण्यात गंभीर अडथळे येत होते. छत्रपती संभाजीनगर परिवहन महामंडळानी केलेल्यासर्वेक्षणात अनेक ठिकाणी तारांची उंची अपुरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही समस्या अधिक तातडीची ठरली. ही परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना (उध्दवबाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भोकरदन तालुका उपप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनीमहावितरण विभागाशी सातत्य पूर्ण पत्र व्यवहार, संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा व प्रत्यक्ष पाठपुरावा करून हा प्रश्न प्राधान्याने हाताळला.त्यांच्या ह्या पुढाकारानंतर भोकरदन महावितरण विभागाने त्वरित कारवाई करत कार्यक्षेत्रामध्ये येणार्‍या संपूर्ण मार्गावरील विजेचे अडथळे तात्काळ दूर केले. महावितरण विभागाने बसमार्गावरील विविध ठिकाणी नवीन पोल उभारणी करून विजेच्या तारांची उंची सुरक्षित पातळीवर नेली. खाली आलेल्या तारांना योग्य अंतर मिळावे यासाठी सुधारित उंची निश्चित करण्यात आली, ज्यामुळे बस वाहतुकीस धोका निर्माण करणारी परिस्थिती पूर्णतः दूर झाली आहे. छत्रपतीसंभाजीनगर ते फुलंब्री-तळेगाव दाभाडी-राजुर केदारखेडा-जवखेडा ठों.नळणी-बरंजळा साबळे बसमार्गावर बससेवा सुरू करण्यास अडथळा ठरणार्‍या खालीलोंबकळणार्‍या विजेच्या तारांची समस्या अखेर मार्गी लागली आहे. शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भोकरदन उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरेयांनी स्वतः पुढाकार घेत सातत्याने संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क,पत्रव्यवहार व पाठपुरावा करत हा मुद्दा प्राधान्याने बस मार्गातील विजेच्या पोल उभारणीपासून तारापर्यंत सर्व समस्या ठोंबरे यांनी स्वतः उभेराहून सोडवल्या. परिणामी, मार्गावरील सर्व धोके दूर झाले असून बससेवासुरू करण्यासाठी आवश्यक अडथळे पूर्णपणे हटले आहेत.ठोंबरे पुढे म्हणाले की, स्थानिक जनतेच्या दीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार असून, ही बससेवा सुरू झाल्यानंतर प्रवास अधिकसुरक्षित, सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे. या कामांमुळे छत्रपती संभाजीनगर-माहोरा बससेवा तात्काळ सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला मार्ग आतापूर्णपणे भयमुक्त तथा अडथळा मुक्त सुरक्षित आणि कार्यक्षम झाला आहे.

००००००००

फोटो ओळी……३- भोकरदन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्यापाठपुराव्यामुळे दशकांपासूनचा विजेचा अडथळा दुर झाला असून महावितरणविभागाकडून विविध ठिकाणी नवीन पोल बसवले तर विजेच्या तारांना सुरक्षित उंची देत बससेवेचा मार्ग मोकळा केला आहे

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजी नगर#फारोळा येथे २६ द.ल.ली. क्षमता असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन करण्यात आले.

vishwatmaklokswamivarta

आजची मोठी बातमी – महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या इतर राज्यांतील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी मोठा दिलासा- तात्काळ नोंदणी करून आरोग्य सेवा करण्यास परवानगी

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स होस्टेल वओल्ड एज होम उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून म्हाडाच्या कामकाजाचा आढावा…

vishwatmaklokswamivarta

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप

डिजिटल शिक्षणाचे धोरण स्विकारणे काळाची गरज- प्रा. राम शिंदे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ अभियानाला गती लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा निर्धार प्रत्येक विभाग व नागरिकांना ई-शपथ घेण्याचे आवाहन