vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षणउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण..

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षणउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण..

मुंबई, प्रतिनिधी:- राज्यातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आणि प्राध्यापकांच्या क्षमतेत गुणात्मकवाढ करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने ‘क्वांटम संगणन उपक्रम’ राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना क्वांटम तंत्रज्ञानासंदर्भातील विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, उपसचिव संतोष खोरगडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, ‘मित्र’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, क्वांटम तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख डॉ. जे. बी. व्ही. रेड्डी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आय-हब क्वांटम तंत्रज्ञान फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुंज टंडन, प्रकल्प संचालक आणि पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेचे प्राध्यापक प्रा.सुनील नायर, मित्राच्या शिक्षण सेलचे वरिष्ठ सल्लागार पूजा मिसाळ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसह विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने दर्जात्मक उच्च शिक्षणाची तयारी सुरू आहे. या उपक्रमातून केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे तर नवयुगातील अध्यापन कौशल्ये ही विकसित केली जातील. प्राध्यापक प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अधिक दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण पोहोचवले जाईल. राज्यातील विविध विद्यापीठांतील व तांत्रिक महाविद्यालयांतील ५०० पेक्षा अधिक प्राध्यापकांना प्रशिक्षण आणि क्वांटम संगणन, संशोधन, नावीन्यपूर्णता व कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे .

आय-हब क्वांटम तंत्रज्ञान फाउंडेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा असून, तो तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

0000

संबंधित पोस्ट

गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या ७५ वर्षांनिमित्तया महापूजा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष महापूजा याच पार्श्वभूमीवर ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – धाकलेश्वर महादेव मंदिर, मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते महापूजा संपन्न

.सात-बारा उताऱ्यावरील नाव नोंदणी, फेरफार प्रक्रिया झाली गतिमान- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नेतृत्त्‌वाखाली महसूल विभागाची विशेष मोहीम- अधिकार अभिलेखात नावनोंदणी होणार जलद- शेतकरी, सामान्य नागरिकांच्या पैसे व वेळेत बचत

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर*

सांगली पॅटर्न ब्रँड तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली जिल्हा समृध्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन- सांगली पॅटर्न कृषि परिषद निर्यात सक्षमीकरण कार्यशाळेस उत्कृष्ट प्रतिसाद

बुलढाणा तालुक्यातील अवसायनातील 103 संस्थांची नोंदणी रद्द होणार; आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

द्राक्ष बागाईतदार संघाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ६५ व्या वार्षिक अधिवेशनाचे व द्राक्ष परिसंवादाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन