vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वारणा धरणात 28.54 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 5500 क्युसेक्स तर वारणा धरणातून 8530 क्युसेक्स विसर्ग सुरू

वारणा धरणात 28.54 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 5500 क्युसेक्स तर वारणा धरणातून 8530 क्युसेक्स विसर्ग सुरू

      सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.54 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 76.52 (105.25), धोम 10.34 (13.50), कन्हेर 7.89 (10.10), धोम बलकवडी 2.49 (4.08), उरमोडी 7.42 (9.97), तारळी 4.96 (5.85), वारणा 28.54 (34.40), राधानगरी 7.24 (8.36), दूधगंगा 18.29 (25.40), तुळशी 2.78 (3.47), कासारी 2.05 (2.77), पाटगांव 3.43 (3.72), अलमट्टी 97.55 (123).

 सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 5500, कण्हेर 190, उरमोडी 500, तारळी 940, वारणा 8530, राधानगरी 3100, दुधगंगा 1600, तुळशी 300, कासारी 800, पाटगाव 300, हिप्परगी बॅरेज 50 हजार 90 व अलमट्टी धरणातून 25 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 13.3 (40) व अंकली पूल हरिपूर 12.8 (45.11)

000000

संबंधित पोस्ट

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन   

महाकुंभात चेंगराचेंगरी : 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमींची भीती,

vishwatmaklokswamivarta

अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील नोकरभरती संदर्भात अहवाल सादर करावा- आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके

मलकापूर नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे अतिकुर रहमान शाफिकूर रहमान विजयी,काँग्रेसचे १४, भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक

vishwatmaklokswamivarta

१० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

इराण आणि अमेरिका इस्त्रायल युद्ध – कुवेत एअरवेजचे विमान केरळमध्ये 20 भारतीयांचे मृतदेह घेऊन दाखल…