vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आज 16 जुलैपासून सुरु होणा-या नमुंमपा पदभरतीसाठी नियोजित केंद्रांवरील व्यवस्थेची समन्वय अधिका-यांकडून काटेकोर पाहणी…

आज 16 जुलैपासून सुरु होणा-या नमुंमपा पदभरतीसाठी नियोजित केंद्रांवरील व्यवस्थेची समन्वय अधिका-यांकडून काटेकोर पाहणी…

नवी मुंबई प्रतिनिधी- दि.16 ते 19 जुलै 2025 रोजी ‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025’ अंतर्गत गट – क आणि गट – ड यामधील एकूण 30 संवर्गातील 668 पदांकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे. याकरिता 12 जिल्ह्यांमध्ये 28 केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

          ही भरती प्रक्रिया काटेकोर रितीने व्हावी यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्ग 1 श्रेणीच्या अधिका-यांची समन्वय अधिकारी म्हणून तसेच 29 अधिका-यांची केंद्र निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या समन्वय अधिका-यांनी व केंद्र निरीक्षकांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे आजच आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन परीक्षा केंद्रांना भेट देत तेथील व्यवस्थेची बारकाईने पहाणी केली आहे.

          सदर परीक्षा ऑनलाईन असल्याने समन्वय अधिका-यांनी केंद्रांवरील बैठक व्यवस्था, संगणक व्यवस्था, लॅन व्यवस्था, जॅमर व्यवस्था, स्वच्छता, प्रसाधनगृह व्यवस्था, पिण्याचे पाणी व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था अशा सर्व बाबींची केंद्र निरीक्षकांसमवेत पहाणी केली आहे व त्याचे अहवाल महापालिका प्रशासन विभागाकडे पाठविले आहेत.

          त्याचप्रमाणे सदर परीक्षा सुव्यवस्थित रितीने पार पाडाव्यात या दृष्टीने ज्या ठिकाणी केंद्रे आहेत अशा सर्व जिल्ह्यांमध्ये संबधित पोलीस ठाण्याशी आधीच केलेल्या पत्रव्यवहारास अनुसरून संपर्क साधून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन घेतला आहे.

          या भरतीमध्ये 668 पदांकरिता 84,774 अर्ज प्राप्त झाले असून परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांपैकी 77 हजारहून अधिक उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र ऑनलाईन डाऊनलोड करुन घेतले असून उर्वरित उमेदवारांनीही ते लवकरात लवकर डाऊनलोड करुन घ्यावे असे संदेश एसएमएस व इ मेलव्दारे पाठविण्यात आलेले आहेत. आपले प्रवेशपत्र घेऊन उमेदवारांनी आपल्याला दिलेल्या परीक्षा स्थळी प्रवेशपत्रात नमूद वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

           नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया ही अत्यंत काटेकोर व पारदर्शक पध्दतीने होत असून नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी करणा-या भूलथापांना व आमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये आणि याबाबत दक्ष राहून थेट स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

शिवसेना दलित आघाडीचा हजारो भुमिहिनांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा-रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा…

कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण

बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

गांधी शांती परिक्षेत जिल्हा कारागृहातील 23 महिला व पुरुष बंद्यांचा सहभाग

शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी, मोफत चष्मे मिळणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार..

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण· मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’…

vishwatmaklokswamivarta