vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नव्या मुंबईतील जलाशयाच्या सखोल स्वच्छतेतून ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाला व्यापक स्वरुप

नव्या मुंबईतील जलाशयाच्या सखोल स्वच्छतेतून ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाला व्यापक स्वरुप

 

         नवी मुंबई प्रतिनिधी-  उदयानांचे शहर याप्रमाणेच तलावांचे शहर ही देखील नवी मुंबईची वेगळी ओळख असून तलावांच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जाते. त्या अनुषंगाने ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभाग कार्यालय क्षेत्रात जलाशय आणि जलाशयांच्या परिसर स्वच्छतेच्या मोहीमा उत्साहाने राबविण्यात आल्या.

अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या या जलाशय स्वच्छता विशेष मोहीमेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या माध्यमातून सर्वच विभागांमध्ये प्रभावी कार्यवाही करण्यात आली.

मोहीमेंतर्गत जलाशयांमध्ये तराफ्यांव्दारे जाउुन जलाशयावर तरंगणारा कचरा जाळीच्या सहाय्याने संकलित करण्यात आला. तसेच जलाशयांच्या किना-यावरील जमिनींचा पावसामुळे शेवाळयुक्त झालेला परिसर पावडर टाकून स्वच्छ करण्यात आला. तसेच परिसरातील नागरिकांना जलाशयात निर्माल्य न टाकण्याचे आवाहन करण्यात आले.

 यामध्ये बेलापूर विभागात सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री. नरेश अंधेर यांच्या नियंत्रणाखाली से.20 बेलापूर गाव अमृतेश्वर तलाव, आग्रोळी तलाव, करावे तलाव, दारावे तलाव या जलाशयांची सखोल स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने जलाशयाच्या काठावर आणि पाण्यावर तरंगणारा कचरा काढून टाकण्यात आला.

   नेरुळ विभागातही सहा. आयुक्त श्री. जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी श्री. अरुण पाटील यांच्या माध्यमातून चिंचोली तलावाचा जलाशय आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र व नागरिक यांच्या सहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

वाशी विभागातही सहा. आयुक्त श्री.सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी श्रीम.जयश्री आढळ यांच्या नियंत्रणाखाली से.7 जागृतेश्वर मंदिर तलाव आणि परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली.

  तुर्भे विभागात सहा. आयुक्त श्री.सागर मोरे व स्वच्छता अधिकारी श्री. जयेश पाटील यांच्या माध्यमातून से.26 कोपरी तलाव, तुर्भे गाव तलाव, खोकड तलाव सानपाडा याठिकाणी जलाशयांची सखोल स्वच्छता करण्यात आली.

कोपरखैरणे विभागातही से.19 येथील धारण तलाव, खैरणे तलाव व महापे तलाव याठिकाणी सहा. आयुक्त श्री. भरत धांडे व स्वच्छता अधिकारी श्री. राजुसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छताकर्मींनी उपस्थित नागरिकांच्या सहयोगाने जलाशय व परिसरांची सखोल स्वच्छता केली.

घणसोली विभागातही सहा. आयुक्त श्री.उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी श्री.विजय पडघन यांच्या माध्यमातून रबाळे तलाव, स्व. राजीव गांधी खदाण तलाव गोठिवली, छत्रपती शिवाजी महाराज तलाव, गुणाली तलाव या ठिकाणी सखोल स्वच्छता करण्यात आली.            ऐरोली विभागात सहा.आयुक्त श्री.सुनिल काठोळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या जलाशय सखोल स्वच्छता मोहीमेत से.20 खाडी तलाव व ऐरोली तलाव याठिकाणी जलाशयाची व परिसराची नागरिकांच्या सहयोगाने सखोल स्वच्छता करण्यात आली.     दिघा विभागातही श्रीगणपती तलाव याठिकाणी सहा.आयुक्त श्री. नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी श्री.प्रविण थोरात यांच्या नियंत्रणाखाली सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अशाप्रकारे ‘सफाई आपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत स्वच्छता विषयक छोट्या छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत विविध ठिकाणी स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार आज जलाशयांच्या स्वच्छता मोहीमा सर्वत्र यशस्वीपणे राबविण्यात आल्या. यापुढील काळातही नानाविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार असून त्यामध्ये स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

आज पासुन जालना महानगरपालिकेच्या कर विभाग तर्फे होणारी मालमत्ता व नळपट्टी वसुली ही ॲानलाईन पद्धतीने सुरू

महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रॅकर्स बस वाहतूक महासंघ तसेच ऑल इंडिया वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने ट्रॅक, टेम्पो, टँकर, बस,ट्रेलर,प्रवासी कार, टॅक्सी यांच्या समस्याची सरकारने दखल न घेतल्यास उग्र आंदोलन छेडणार 

राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीस्थितीचा घेतला आढावा..

महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश!**बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ?* – रमेश शिंदे

ड्राय वेस्ट बँक’ या अभिनव उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचा सन्मान

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या ऑगस्ट महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta