vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीस्थितीचा घेतला आढावा..

राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीस्थितीचा घेतला आढावा..

मुंबई, प्रतिनिधी :- राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संचालक डॉ.भालचंद्र चव्हाण यांनी राज्यातील हवामानाविषयी अनुषंगिक माहिती दिली. यावेळी आमदार विजय रहांगडाले उपस्थित होते.

 

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ज्या जिल्ह्यात रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिले आहेत, त्या ठिकाणी संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. नागरिकांना वेळीच दक्षता इशारा देण्यात यावेत. धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ याबाबत नागरिकांना सूचना देण्यात याव्यात. पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.

 

भारतीय हवामान विभागाशी सातत्याने संपर्कात राहून राज्यातील पर्जन्यमांचे अंदाज नागरिकांना वेळेत दिले जावेत. आवश्यक त्या ठिकाणी राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके पाठवावीत, अशा सूचनाही आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या.

 

००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत6 एप्रिल रोजी अयोध्या यात्रेसाठी विशेष रेल्वेचे आयोजन· जिल्ह्यातील 800 लाभार्थी करणार अयोध्येकडे प्रस्थान..

छत्तीसगड मधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २ नक्षलवादी ठार, नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त.

vishwatmaklokswamivarta

फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाच्या पंढरपूर आवृत्ती 2025 मध्ये 5000 हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग;

बिहारमधल्या पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, १५ जिल्ह्यांमधले ४८ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित

vishwatmaklokswamivarta

नाफेडतर्फे तुर खरेदीसाठी शेतकऱ्यांची 24 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी सुरु

vishwatmaklokswamivarta

राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार – महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta