vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत6 एप्रिल रोजी अयोध्या यात्रेसाठी विशेष रेल्वेचे आयोजन· जिल्ह्यातील 800 लाभार्थी करणार अयोध्येकडे प्रस्थान..

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत6 एप्रिल रोजी अयोध्या यात्रेसाठी विशेष रेल्वेचे आयोजन· जिल्ह्यातील 800 लाभार्थी करणार अयोध्येकडे प्रस्थान..

 

जालना, प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचा शासन निर्णयानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहुन अधिक वयाच्या जेष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याकरीता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील 800 लाभार्थ्यांना रविवार, दि. 6 एप्रिल, 2025 ते दिनांक 10 एप्रिल, 2025 या कालावधीत जालना येथुन अयोध्या श्रीराम मंदीर यात्रेसाठी विशेष रेल्वे प्रस्थान करणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यात्रेसाठी जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील 800 लाभार्थ्यांना तीर्थ दर्शनासाठी नेण्यात येणार असुन, सदर लाभार्थ्यांची यापुर्वी जिल्हास्तरीय समितीने निवड केली आहे. सदर पात्र लाभार्थ्यांची यादी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय जालना येथे लावण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पात्र लाभार्थ्यांने तीर्थदर्शन यात्रेसाठी आपल्या सोबत वैद्यकीय प्रमाणत्र, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो व आवश्यकता असल्यास औषधे व इतर आवश्यक वस्तु सोबत ठेवाव्यात असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

त्रि-स्तरीय पंचायत राज संस्थांच्या लोकप्रतिनिधींचे जिल्हास्तरीय ‘पंच संमेलन’विकसित भारत रोजगार आणि उपजिवीका हमी अभियानाद्वारे,गावचा शाश्वत विकास साधावा- रोहयो मंत्री भरत गोगावले,गावाच्या विकासाचा प्राधान्यक्रम ठरवा- पालकमंत्री शिरसाट..

वाशीत २४ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत’महालक्ष्मी सरस २०२६’चे आयोजन महिला बचत गटांच्या कौशल्यपूर्ण दर्जेदार उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे ग्रामविकास मंत्री यांचे आवाहन

पीसीपीएनडीटी कायद्याच्या कडकअंमलबजावणीसाठीसोनोग्राफी, एमटीपी केंद्रांची वेळोवेळी तपासणी करा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण· मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’…

vishwatmaklokswamivarta

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार सन 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य..

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे कामगार व नोकरदार महिलांना मिळणार दिलासा