vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे कामगार व नोकरदार महिलांना मिळणार दिलासा

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,कामगार व नोकरदार महिलांना मिळणार दिलासा.

मुंबई प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची काळजी घेता यावी, यासाठी ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत “पाळणा” ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे कामगार व नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पाळणाघरांमध्ये डे-केअर सुविधा, पूर्व शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच मुलांना दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम शिजवलेले जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता देण्यात येईल.
पाळणा घर महिन्यात 26 दिवस, दररोज 7.5 तास सुरु राहील, यामध्ये जास्तीत जास्त 25 मुले असतील. याठिकाणी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल. वीज, पिण्याचे पाणी, बालस्नेही शौचालय यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.
या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविका यांना ₹1500 प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे. अंगणवाडी मदतनीस यांना ₹750 प्रतिमाह, पाळणा सेविका मानधन यांना ₹5500 प्रतिमाह, तर पाळणा मदतनीस यांना ₹3000 प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे.

—– 000 —-

संबंधित पोस्ट

कल्याण शहरातील अद्ययावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

रायगड जिल्ह्यातील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेलेले ३७ नागरिक सध्या सागा (चीन) येथे सुरक्षित आहेत. सर्वांची प्रकृती ठीक असून, त्यांच्यामध्ये दोन डॉक्टरही आहेत.

डाक अदालत’ चे ( दि.८जून रोजी) आयोजन; तक्रारी नोंदवण्याचे आवाहन

पाल’ देवस्थानला पर्यटन स्थळासाठी प्रस्ताव सादर करावा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

जम्मू कश्मीरच्या भद्रवाह – चंबा मार्गावर खोल दरीत वाहन कोसळून झालेल्या अपघातात १० जवानांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta

कृष्णा, कुडाळी व वसना नदीमधून पाणी उपसा करण्यास बंदी