vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नाफेडतर्फे तुर खरेदीसाठी शेतकऱ्यांची 24 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी सुरु

नाफेडतर्फे तुर खरेदीसाठी शेतकऱ्यांची 24 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी सुरु

 

सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात पणन हंगाम 2024-2025 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेडच्या वतीने तुर खरेदी करण्यात येणार आहे. तुर खरेदीकरीता शासनाच्या सुचनेनुसार शेतकऱ्यांची एन.ई.एम.एल पोर्टलवर 24 फेब्रुवारी 2025 पर्यत ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु राहणार आहे, असे जिल्हा पणन अधिकारी संदिप जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

सांगली जिल्ह्यात विष्णुआण्णा खरेदी विक्री संघ, सांगली (संपर्क श्री. सुर्यकांत शिंदे, मो.नं. 7507777849) या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. किमान आधारभुत किंमत योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांना या हमीभाव खरेदी केंद्रावर तुर विक्री करावयाची आ,हे अशा शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी चालु हंगामातील तुर पिकाची पिकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला अद्ययावत मुळ सातबारा उतारा, बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत (IFSC CODE )सहीत, आधार कार्ड प्रत तसेच शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत. हंगाम 2024-25 करीता केंद्र शासनाने तुर पिकासाठी 7 हजार 550 रूपये प्रति क्विंटल इतका हमीभाव दर निश्चित केलेला आहे.

ज्या शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ घ्यायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहनही श्री.जाधव यांनी केले आहे.000000

संबंधित पोस्ट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रायगड दौरा, ड्रोन व हवाई उपकरणांवर बंदी…

प्रवासी वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ योजनेत नोंदणीचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन…

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

शिराळा तालुक्यात 8.9 मि.मी. पावसाची नोंद

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमागील ७ दिवसांत १७,१२० आयुष्मान कार्ड व १,२९३ वय वंदना कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण