vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-बांधकामासाठी पुनर्प्रक्रियाकृत पाणी उपलब्ध करून देण्याकरिता विभागनिहाय समन्वय अधिकारी नियुक्ती

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-बांधकामासाठी पुनर्प्रक्रियाकृत पाणी उपलब्ध करून देण्याकरिता विभागनिहाय समन्वय अधिकारी नियुक्ती

 

 

नवी मुंबई प्रतिनिधी-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत सिडको विकसित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची त्याचप्रमाणे इतर खाजगी भूखंडावरील विकास कामे प्रगतीपथावर आहेत. सद्यस्थितीत सदर विकास कामांकरिता बहुतांशी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.

ही बाब विचारात घेऊन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे मार्गदर्शनानुसार नगररचना विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांसाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय पुनर्प्रक्रियाकृत (Tertiary Treated) पाण्याचा वापर करणे विकासकांवर बंधनकारक करण्यात येत आहे. याविषयी नवी मुंबई महानगरपालिकेकडून दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होऊ नये यादृष्टीने पिण्याच्या वापराव्यतिरिक्त इतर वापराकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रक्रिया केंद्रामधील प्रक्रियायुक्त पाणी उपलब्ध करून घेऊन त्याचा वापर बांधकामासाठी करणेबाबत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध नोडमध्ये कार्यरत असलेल्या अधिका-यांमार्फत कार्यवाही होत आहे.

अ.क्र.

मलनि:स्सारण प्रक्रिया केंद्राचे ठिकाणउप अभियंत्याचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक. कनिष्ठ अभियंत्याचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक.

1बेलापूर सेक्टर-12श्री. संतोष उनवणे (9821430951)

श्री. अभय गावीत (9967603509)

2नेरुळ सेक्टर-50श्री. संतोष उनवणे (9821430951)

श्री. अभय गावीत (9967603509)

3 सानपाडा सेक्टर-20

श्री. दिपक सुर्यराव (9821712184)श्री. निखिल काळे (9967108740)

4वाशी सेक्टर-18 श्री. दिपक सुर्यराव (9821712184)

श्री. निखिल काळे (9967108740)

5,कोपरखैरणे सेक्टर-14श्री.पंढरीनाथ चवडे (9167265565)श्री. चेतन कोळी (8169081917)

6घणसोली सेक्टर-15

श्री.कैलास गायकवाड (9869487879)

श्री. प्रविण विश्वे (9892450781)

7ऐरोली सेक्टर-18 श्री.पंढरीनाथ चवडे (9167265565)

श्री. चेतन कोळी (8169081917)

तरी उपरोक्त नमूद अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सर्व विकासक व बांधकाम व्यावसायिकांनीमहानगरपालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार प्रक्रियाकृत पाणी बाधकामासाठी उपलब्ध करून घेऊन पिण्याच्या पाण्याची बचत करावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनवाचनातून मिळते प्रत्येकाला प्रेरणा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

महालक्ष्मी साजसजावट स्पर्धा उत्साहात स्लग- दोन हजार स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगरासह-ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू

15एप्रिल,2026 रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

जेष्ठ नागरीक समन्वय समितीच्यावतीने आरोग्य शिबीर संपन्न;शासकीय योजना व सुविधेचा लाभ जेष्ठानी घ्यावा- जिल्हाधिकारी..

vishwatmaklokswamivarta