vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या ऑगस्ट महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या ऑगस्ट महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

            मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे ऑगस्ट – २०२५ मध्ये ९ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, १४ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी रक्षाबंधन विशेष, १९ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, २० ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र गौरव व दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

 महाराष्ट्र तेजस्विनी या मासिक सोडतीमधून TJ- 01/9782 या महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर व TJ- 07/9977 श्री. गुरूदेवदत्त लॉटरी एजन्सी, पुणे यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रु.५ लाखाचे प्रथम क्रमांकाची दोन बक्षिसे जाहिर झाली आहेत.

तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रू. ८ लाखाच्या प्रथम क्रमांकाची एकूण दोन बक्षिसे जाहीर झाली आहेत.

याशिवाय ऑगस्ट-२०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १२९३८ तिकीटांना रू. ४१,६०,२५०/- व साप्ताहिक सोडतीतून ५८४६३ तिकीटांना रू. १,६३,९२,३००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

डॉ. संजय लाखे पाटील यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती*

सांगली जिल्ह्यात 44 गावातील 47 नवीनरास्त भाव दुकानासाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

मिफ्फ-2026 निमित्त फिल्मसिटीकडून मराठी लघुपट व माहितीपटांचे आयोजन

उपमुख्यमंत्री कार्यालय (जनसंपर्क कक्ष)मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प,सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल – इंदापूर टप्प्याचे काम,डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार· राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची माहिती..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा संगम विविध देशातील ३० दिग्गज शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचा गौरव