vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यातंत्रज्ञानस्थानिक बातम्या

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा25 सप्टेंबरपासून शुभारंभ  नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा25 सप्टेंबरपासून शुभारंभ  नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

राज्य प्रतिनिधी-मुंबई,: डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वांसाठी सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत २५ सप्टेंबर 2025 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) येथे ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातून देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती महिना (CSAM) 2025 राबविण्यात येणार आहे.

या अभियानाचे उद्घाटन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असून, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, तसेच गृहमंत्रालय, क्रेट-इन (CERT-In), सेबी (SEBI) आणि बीएसई (BSE) यांचे मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.

हे अभियान गृह मंत्रालयाच्या इंडिया सायबरक्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C), इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, क्रेट-इन (CERT-In) यांच्या सहकार्याने राबवले जात असून, उद्योगक्षेत्रातील भागीदार संस्थांनी या उपक्रमात योगदान दिले आहे.

हे अभियान नागरिक, संस्था व भागधारकांना सायबर सुरक्षिततेच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्यास, सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहित करणार आहे. त्याचबरोबर, वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांना माहिती दिली जाईल आणि ऑनलाईन सुरक्षित राहण्याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.

000000

 

संबंधित पोस्ट

बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६-निवडणूक नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांना निवडणूक कामकाजासंदर्भात मार्गदर्शन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे बजवावी -उत्तम दिघे

शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत

vishwatmaklokswamivarta

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर यांच्या मार्फत सन २०२६-२७ साठी ‘५० टक्के अनुदान योजना’ (७ लाभार्थी) आणि ‘बीज भांडवल योजना’ (१० लाभार्थी’) याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले

प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन करणा-या सेक्टर 19 तुर्भे येथील बांधकाम साईटवर सीलबंद कारवाई…

एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्यानेअपारंपरीक इंधनावर परावर्तीत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उदंड प्रतिसादाने ‘महालक्ष्मी सरस -२०२६’ प्रदर्शनाची सांगता; २२ कोटींहून अधिक रुपयांची रेकॉर्डब्रेक उलाढाल ग्रामीण महिलांच्या कष्टाचे नवी मुंबईत झाले सोने ; ‘स्मार्ट’ सुविधांनी जिंकली मुंबईकरांची मने