vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर यांच्या मार्फत सन २०२६-२७ साठी ‘५० टक्के अनुदान योजना’ (७ लाभार्थी) आणि ‘बीज भांडवल योजना’ (१० लाभार्थी’) याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर यांच्या मार्फत सन २०२६-२७ साठी ‘५० टक्के अनुदान योजना’ (७ लाभार्थी) आणि ‘बीज भांडवल योजना’ (१० लाभार्थी’) याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून कर्ज प्रस्ताव..

राज्य प्रतिनिधी-#चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर, होलार आदी) बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी व त्यांच्या आर्थिक उन्नतीला चालना देण्यासाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येत आहेत. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर यांच्या मार्फत सन २०२६-२७ साठी ‘५० टक्के अनुदान योजना’ (७ लाभार्थी) आणि ‘बीज भांडवल योजना’ (१० लाभार्थी’) याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पॅनकार्ड, उद्योग आधार प्रमाणपत्र, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, ग्रामपंचायत,नगरपालिका, महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

व्यवसायासंदर्भातील तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला, आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, जीएसटी क्रमांक असलेले दरपत्रक जोडवे. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्जदाराचे वारसदारांच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र; तसेच जामीनदारांचे वीज नमुन्यातील शपथपत्र, आधार संलग्न बँक खाते तपशील, सक्षम जामिनदारांची कागदपत्रे आणि बँकेचा सिबिल अहवाल आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.

इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्जाच्या तीन प्रती कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर, गव्हर्नमेंट लेदर वर्किंग स्कूल कंपाऊंड, खेरवाडी, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०००५१ येथे स्वतः उपस्थित राहून मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसह कर्ज प्रस्ताव दाखल करावेत.

संबंधित पोस्ट

विचाराधीन बंद्यांना न्यायाचा मार्ग दाखवणारा विधी साहाय्य उपक्रम· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सुरु असलेला उपक्रम

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना  उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

जिल्हास्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026” चा समारोप

लोकल अपघातानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार दिवा-CSMT जलद लोकल सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी, गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर. “नवीन मार्गिका, १५ डब्यांच्या लोकल्स आणि जलद सेवा गरजेच्या!”

अल् निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९२ टक्के असेल, ईशान्य भारत वगळता देशभरात पावसाचं प्रमाण कमी– हवामान विभागाची माहिती.

महाराष्ट्राने दूरदृष्टी नेतृत्व गमावले-अजितदादा पवार यांना सर्व पक्षीय शोकसभेत श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta