vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्रांमधून आता ५०० हून अधिक शासकीय सेवा उपलब्ध-सर्व केंद्रे अद्ययावत करण्याचे सीईओ मेघना कावली यांचे निर्देश

ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्रांमधून आता ५०० हून अधिक शासकीय सेवा उपलब्ध-सर्व केंद्रे अद्ययावत करण्याचे सीईओ मेघना कावली यांचे निर्देश

नांदेड, प्रतिनिधी– ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा व प्रमाणपत्रे गावपातळीवरच उपलब्ध व्हावीत, यासाठी ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्रे अद्ययावत करून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिले आहेत.

पूर्वी या केंद्रांमध्ये मर्यादित स्वरूपातील सेवा उपलब्ध होत्या. मात्र आता महा ऑनलाईनचे सर्व अधिकार ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रांना प्राप्त झाले असून महसूल विभागासह विविध विभागांच्या ५०० हून अधिक शासकीय सेवा गावपातळीवर उपलब्ध होणार आहेत.

या सेवांमध्ये उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रिमिलेयर, अल्पभूधारक, राष्ट्रीयत्व, जन्म, मृत्यू, विवाह प्रमाणपत्र, नमुना-८ उतारा आदी विविध दाखले व प्रमाणपत्रांचा समावेश आहे. तसेच पीक विमा, महाडीबीटीवरील अर्ज, मतदार नोंदणी, पॅन कार्ड अर्ज, आयुष्मान कार्ड, सातबारा उतारा, विविध शासकीय अनुदान योजना, वीज व पाणी बिल भरणा, बँकिंग सुविधा, शिष्यवृत्ती अर्ज, बांधकाम कामगार नोंदणी तसेच रेल्वे व बस आरक्षण आदी सेवाही या केंद्रांमार्फत उपलब्ध होणार आहेत.

या उपक्रमामुळे नागरिकांना तहसील कार्यालय, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही. नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होऊन शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होतील.

नांदेड जिल्ह्यातील १,३१० ग्रामपंचायतींमध्ये संगणक चालकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक ग्रामपंचायतीला महा ऑनलाईनचे नवीन आयडी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संबंधित आयडी व पासवर्ड कार्यान्वित करून सेवा केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर महाआयटीचे जिल्हा प्रकल्प प्रमुख कुलदीप जोशी तसेच राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक माधव देवडे हे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत

चौकट-महा ऑनलाईनचे प्राप्त झालेले आयडी व पासवर्ड तातडीने कार्यान्वित करून ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू करावीत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठविण्यात आले आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवा वेळेत, सुलभपणे व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ कार्यवाही करावी

000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय छात्रसेना शिबिरासाठी27 मे पर्यंत दरपत्रके सादर करण्याबाबत आवाहन

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरती-दि.१ ते ८ जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहयोगाने नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम**श्रीसदस्यांसह नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांना सेवाभावी आदरांजली*

जनगणनेत अहिल्यानगर महानगरपालिका राज्यात द्वितीयअवघ्या २१ दिवसांत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण ; आयुक्तांनी मानले नागरिकांचे आभार..

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांची नोंदणी

vishwatmaklokswamivarta

राज्य सरकार चा निर्णय  दुधाच्या भेसळीवर मोक्का कायदा लागू करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार…