vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

5 रुपयांच्या नोटा व 20 रू.ची नाणी कायदेशीर चलन; स्वीकार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

5 रुपयांच्या नोटा व 20 रू.ची नाणी कायदेशीर चलन; स्वीकार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

नांदेड, प्रतिनिधी: भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ₹5 च्या नोटा तसेच ₹20 ची नाणी ही पूर्णपणे कायदेशीर चलन (लीगल टेंडर) असून सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये त्यांचा स्वीकार करणे बंधनकारक आहे. मात्र, काही ठिकाणी या नोटा व नाण्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे

यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक प्रतिष्ठाने, शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका तसेच सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, ₹5 च्या नोटा आणि ₹20 ची नाणी कोणत्याही शंका किंवा गैरसमजाशिवाय स्वीकारावीत

भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सर्व चलनी नोटा आणि नाणी वैध असून त्यांचा स्वीकार करण्यास नकार देणे अयोग्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच बँका, व्यापारी संघटना आणि संबंधित संस्थांनी याबाबत जनजागृती करावी, असेही त्यांनी म्हटले आहे

नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांना बळी न पडता कायदेशीर चलनाचा स्वीकार करावा आणि व्यवहार सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

१५ ऑगस्ट देशभक्तीपर गीतांनी साजरा करा – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना विविध उपक्रम आयोजनाच्या सूचना  • जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक तहकूब

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील बँकांची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज दिनांक १५.०१.२०२५ पासुन शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्धएकूण ८६७ मतदारांचा समावेश; ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदार..

प्रयागराज येथे महाकुंभच्या शेवटच्या महाशिवरात्री दिवशी हवाई दलाचे जोरदार शक्ती प्रदर्शन; लढाऊ विमानांच्या एअर शोचे मनमोहक दृश्य…

vishwatmaklokswamivarta

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना- तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश..