vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खाणीतील कामगारांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अनुदान

खाणीतील कामगारांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अनुदान

 

नांदेड, प्रतिनिधी : महाराष्ट्र व गोवा राज्य तसेच दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव केंद्रशासित प्रदेशातील बीडी, सिनी, चुनखडी दगड, डोलोमाईट, लोह-मँगनीज व क्रोम धातूच्या खाणीतील कामगारांच्या मुला-मुलींना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शिष्यवृत्ती व आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (NSP) ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहेयोजनेअंतर्गत इयत्ता 1 ली ते 4 थीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वार्षिक 1 हजार रुपये, इयत्ता 5 वी ते 8 वीपर्यंत 1 हजार 500 रुपये, इयत्ता 9 वी ते 10 वीपर्यंत 2 हजार रुपये, तर इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना 3 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल. आयटीआय, पॉलिटेक्निक आणि पदवी अभ्यासक्रम (बीएससी, कृषी पदवीसह) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, तर बीई, एमबीबीएस, एमबीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 25 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे

अर्ज प्रक्रिया 1 जून 2026 पासून सुरू झाली असून प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 आहे. पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पात्रता, अटी व अर्जाची सविस्तर माहिती राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (scholarships.gov.in) वर उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या स्पष्ट व वाचनीय स्कॅन प्रती अपलोड कराव्यात. अर्ज सादर केल्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्थेकडून त्याची पडताळणी झाली आहे की नाही, याची खात्री विद्यार्थ्यांनी स्वतः करून घ्यावी. अर्ज पडताळणीची जबाबदारी विद्यार्थ्यांचीच राहणार आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त झालेले किंवा संस्थेमार्फत पडताळणी न झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

अर्ज करताना आवश्यक बाबी,प्रथमच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी OTR (One Time Registration) करणे आवश्यक आहे. अर्जासाठी आधार कार्ड अनिवार्य असून विद्यार्थ्यांचे स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे. संयुक्त खाते असल्यास त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव प्रथम असावे. पालकांच्या एकापेक्षा अधिक मुलांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतंत्र खाते असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी संलग्न असावे तसेच विद्यार्थ्याचा स्वतंत्र मोबाईल क्रमांक असावा.

बीडी कामगारांच्या ओळखपत्रावर आश्रित सदस्यांची नावे नमूद असणे आवश्यक आहे. सन 2025-26 चे उत्पन्न प्रमाणपत्र राजस्व अधिकाऱ्यांकडून जारी केलेले असावे. उत्पन्न प्रमाणपत्रावर पिवळ्या रंगातील हायलाइट ग्राह्य धरले जाणार नसून हिरव्या रंगातील चिन्ह असणे आवश्यक आहे. खाण कामगारांच्या विद्यार्थ्यांसाठी नियोक्त्याने दिलेले ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र आवश्यक असून त्यामध्ये फॉर्म-बी नोंदणी क्रमांक आणि आश्रितांची नावे नमूद असावीत

विशेष सूचना,केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही संस्थेकडून मेरिट-आधारित शिष्यवृत्ती मिळत असली तरी विद्यार्थी मंत्रालयाच्या कल्याणकारी शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. मात्र, एकाच प्रकारातील एकापेक्षा अधिक मेरिट-आधारित किंवा कल्याणकारी शिष्यवृत्तीचा लाभ एकाच वेळी घेता येणार नाहीऑनलाइन अर्ज प्रक्रियेदरम्यान अडचण आल्यास नागपूर मुख्यालयाशी 0712-2510200, 0712-2510474 या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा wengp-labour@nic.in या ई-मेलवर संपर्क साधावा. तसेच जवळच्या श्रम कल्याण संघटनेच्या दवाखान्यातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी किंवा क्षेत्रीय प्रभारी यांच्याकडूनही अधिक माहिती मिळू शकते

अशी माहिती शासकीय आयुर्वेदिक बीडी कामगार दवाखान्याचे वैद्य डॉ. रमेश डी. चामलवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

0000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी पहिल्या टप्प्यात होणार 8 चार्जींग स्टेशन कार्यान्वित…

vishwatmaklokswamivarta

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांची नियुक्ती

दख्खन जत्रेतून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दख्खन जत्रा 2025 चे उद्‌घाटन- 21 मार्चपर्यंत सुरू राहणार प्रदर्शन

दिव्यांग क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांना आवाहन 

vishwatmaklokswamivarta

आखाती प्रदेशातील बदलत्या सागरी सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने संबंधित सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलीस दलाने व्हिडिओ पार्लर, कॅसिनोंची तपासणी करावी -पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सहाव्या बैठक..

vishwatmaklokswamivarta