vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज दिनांक १५.०१.२०२५ पासुन शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण मोहीम…

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज दिनांक १५.०१.२०२५ पासुन शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण मोहीम..

राज्य प्रतिनिधी-जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज दिनांक १५.०१.२०२५ पासुन शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शहरातील वाळकेश्र्वर मंदिर ते सिपी कॉलेज पर्यंत रहदारीस अडथळा निर्माण करणारे पत्र्याचे शेड, आरसीसी वॉल कंपाऊंड, आरसीसी दुकाने असे एकूण 15-16 अतिक्रमणे निष्कासित करण्यात आले. सदरचे अतिक्रमण काढणेकरिता जालना मनपाचे आयुक्त श्री. संतोष खांडेकर यांचे मार्गदर्शन, पोलीस प्रशासन तसेच श्रीमती सुप्रिया चव्हाण, सहायक आयुक्त यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. अतिक्रमण काढतेवेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती प्रियंका राजपूत यांनी देखील भेट देऊन अतिक्रमण काढणेसंदर्भात उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना सूचना दिल्या.

 

            सदर कारवाईमध्‍ये स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख श्री पंडित पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर अभियंता श्री सय्यद सउद, अभियंता श्री. अनिल भद्रे, श्री. अनील काळे, स्वच्छता निरीक्षक श्री. अशोक लोंढे, श्री. विलास गावंडे, श्री.हरीहर चांदोडे, सतिष पाजगे, श्री. निलेश शंकरपेल्‍ली, श्री. शोएब कुरेशी, अरुण वानखेडे, श्री. रविंद्र कल्‍याणी, राधेश्‍याम लोखंडे अधिनस्त जवान, सफाई कर्मचारी वाहन व्यवस्थासह उपस्थित होते. शहरातील सर्व नागरिकांना जालना शहर महानगरपालिका मार्फत विनंती करण्यात येते की, शहरात सदरची अतिक्रमण मोहीम अशीच निरंतर चालू राहणार आहे, तरी आपले अतिक्रमण क्षेत्र आपण स्वतः काढून घ्यावे, नसता जालना शहर महानगरपालिका मार्फत कारवाई करण्यात येईल.

संबंधित पोस्ट

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण कोस्टल रोड आज पासून २४ तास खुलालवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणारवर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण कोस्टल रोड आज पासून २४ तास खुलालवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणारवर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी 

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,· नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध गोदावरी स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा

vishwatmaklokswamivarta

ओबीसी महामंडळाची थकीत व्याज दरात सवलत योजना…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील बेटांवर ध्वजारोहणाचा ऐतिहासिक उपक्रमजिल्ह्यात घारापुरी, उंदेरी, खांदेरी, कुलाबा किल्ला, जंजिरा, कासा, पद्मदुर्ग, आणि सर्जेकोट या बेटांवर ध्वजारोहण..

vishwatmaklokswamivarta

शासकीय मुकबधिर विद्यालय,विद्यानगर-अलिबाग येथे मोफत प्रवेश सुरू