vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांसाठी सावळी येथे 29 जुलैला व्यवहारिक मराठी भाषा पाठ्यक्रम कार्यशाळा

अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांसाठी सावळी येथे

29 जुलैला व्यवहारिक मराठी भाषा पाठ्यक्रम कार्यशाळा

        सांगली, प्रतिनिधी  : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार राज्यात अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांसाठी दि. 1 जून ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत व्यवहारिक मराठी भाषा पाठ्यक्रम उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील सर्व अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक चालकांसाठी बुधवार, दि. 29 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता कुपवाड एमआयडीसी, सावळी येथे व्यवहारिक मराठी भाषा पाठ्यक्रम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक चालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जगदाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            जिल्ह्यातील सर्व अमराठी ऑटोरिक्षा/ टॅक्सी परवानाधारकांना जुजबी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असून अमराठी ऑटोरिक्षा/टॅक्सी परवानाधारकांना प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक आहे. पाठ्यक्रम कार्यशाळा पूर्ण करणाऱ्या अमराठी ऑटोरिक्षा/टॅक्सी परवानाधारक यांना कोकण मराठी साहित्य परिषद व मुंबई मराठी साहित्य संघ यांच्याकडून अधिकृत प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे. हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे असून परिवहन विभागाच्या दिनांक 16 ऑगस्ट 2026 पासून तपासणी दरम्यान अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक चालक यांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे याची सर्व परवानाधारक चालकांनी नोंद घ्यावी, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे स्पष्ट करण्यात आले आहे.

            या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच नियोजन व पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उच्चस्तरीय समितीची कार्यशाळा दि. 14 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्ह्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक संघटनांचे पदाधिकारी, नोडल अधिकारी तथा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   जिल्ह्यातील सर्व अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक चालकांनी या संधीचा लाभ घेऊन व्यवहारिक मराठी भाषा पाठ्यक्रम पूर्ण करावा व आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जगदाळे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागाचा विकास होणार*  – सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले*

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शबरी नॅचरल्स’चा डंका आता दिल्लीपर्यंत; केंद्रीय जनजातीय संचालक डॉ. वर्नाली डेका यांच्याकडून कौतुकाची थाप

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

देशातील प्रत्येक नागरिक सहकार चळवळीशी जोडला जाणार – केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा आरंभ

vishwatmaklokswamivarta