vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मान्सूनमध्ये वीज पडण्यापासून बचाव करण्यासाठी ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

मान्सूनमध्ये वीज पडण्यापासून बचाव करण्यासाठी ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अमरावती, प्रतिनिधी मान्सून काळात, ।विशेषतः जून आणि जुलै महिन्यांत वीज पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जीवित, वित्त आणि पशुहानी होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘दामिनी’ मोबाईल ॲपच्या वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आशिष येरेकर यांनी केले आहे.

या ॲपच्या माध्यमातून वीज पडण्याच्या संभाव्य घटनांची पूर्वसूचना सुमारे १५ मिनिटे आधी मिळू शकते. जीपीएस प्रणालीवर आधारित असलेले हे ॲप वापरकर्त्याच्या सद्यस्थितीनुसार परिसरातील विजेची हालचाल आणि संभाव्य धोका दर्शविते, ज्यामुळे नागरिकांना वेळेत सुरक्षित ठिकाणी जाणे शक्य होते. ग्रामपातळीवरील सर्व स्थानिक व शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून, त्यातील अलर्टनुसार नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि जीवितहानी टाळण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

असे डाऊनलोड करा ‘दामिनी’ ॲप

हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘Damini Lightning Alert’ असे शोधावे आणि अधिकृत ॲप इन्स्टॉल करावे. ॲप सुरू केल्यानंतर मोबाईलचे लोकेशन (GPS) सुरू करून आवश्यक परवानग्या द्याव्यात, तसेच वेळेवर सूचना मिळण्यासाठी नोटिफिकेशन सुविधा सुरू ठेवावी.

जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, आपदा मित्र व सखी, कोतवाल, आशा वर्कर्स, सरपंच आणि पोलीस पाटील यांना या ॲपचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, वीज आणि पूर या आपत्तींमध्ये ‘काय करावे व काय करू नये’ याबाबत विनाईल बोर्डच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 

00000

 

Amravati Collector

संबंधित पोस्ट

आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड

एसटी’च्या आर्थिक सक्षमतेसाठी विनावाहक बससेवेला प्राधान्य द्या– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मृत विद्यार्थ्यांच्या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत… वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना आर्थिक दिलासा आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्याकडे केली होती मदतीची मागणी

भाजपा जालना महानगरात “मन की बात” कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पंतप्रधान मोदीजींच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यकर्त्यांना नवचेतना – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान