vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिनात सुमारे ५ हजार नागरिक सहभागी

‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिनात सुमारे ५ हजार नागरिक सहभागी

पुणे प्रतिनिधी

‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, विविध योग संस्था तसेच संघटना यांच्या सहकार्याने सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये सुमारे ५ हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

 

यावेळी खासदार प्रा.मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासणे, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपायुक्त माधव जगताप, डॉ. संतोष टेंगले, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आदी उपस्थित होते.

 

यावेळी प्रा. कुलकर्णी यांनी, नागरिकांनी योगा केल्यामुळे आरोग्य सदृढ राहते, मन प्रसन्न राहते, जीवनात सकारात्मक विचार करण्यास प्रोत्साहन मिळते, त्यामुळे नागरिकांनी दररोज योगा करावे असे आवाहन त्यांनी केले.

 

श्रीमती महापौर नागपुरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.’फिट इंडिया मूव्हमेंट’ला प्रोत्साहनदेशव्यापी ‘फिट इंडिया मूव्हमेंट’च्या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जिल्ह्यात साजरा करण्यात आला. योग ही सर्वांगीण आरोग्य व कल्याणासाठी जीवनपद्धती म्हणून प्रोत्साहित करण्याचा या दिनाचा उद्देश आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य व सामाजिक सहभाग यासाठी योग ही एक प्रभावी चळवळ म्हणून उदयास आली आहे, असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.

यावेळी विविध प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, खेळाडू, प्रशिक्षक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, युवक, युवती, महिला, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि क्रीडाप्रेमी आदींनी सहभाग नोंदवला.मुख्य योग प्रशिक्षक मनाली देव यांच्या मार्गदर्शनाखाली ६० योग प्रशिक्षकांकडून प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून योगा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सेवाभावी शैक्षणिक संस्था, योग संस्था, क्लब, मंडळे, अकॅडमी, तालुक्यांचे क्रीडा संकुल, क्रीडा मंडळे, क्रीडा संघटना तसेच युवक व महिला मंडळांनी विविध ठिकाणी स्थानिक पातळीवर योग सत्रांचे आयोजन करण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

विभागीय आयुक्त दिलीप गावडे सेवानिवृत्तशासकीय सेवेत सर्वसामान्यांसाठी काम केल्याचा आनंद- दिलीप गावडे

पोलीस दलाची कार्यक्षमता व बौद्धिक वाढीसाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार – केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय स्पर्धेत सर्वोच्च विजेता ठरला तेलंगणा संघ; अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धांची सांगता

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार

तयारी नरनाळा महोत्सवाची; दरपत्रके मागवली

vishwatmaklokswamivarta

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार – एआय तंत्राचाही वापर , नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मुंबई व छत्रपती संभाजीनगरमधील शैक्षणिक संस्था, वसतिगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकास योजनासाठी ५०० कोटीची तरतूद

vishwatmaklokswamivarta