vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

            सांगली, प्रतिनिधी: सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासनांतर्गत कार्यरत गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, मिरज येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन वसतिगृहाचे अधीक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, इयत्ता 11 वी, 12 वी तसेच प्रथम वर्षातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक (बी.एस्सी., बी.कॉम., बी.ए.) अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिक मागास, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अपंग व अनाथ विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/⁠ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.

            वसतिगृहात विनामूल्य प्रवेश, मोफत निवास व भोजन, स्टेशनरीसाठी 4 हजार रुपये, दरमहा 1 हजार रुपये निर्वाह भत्ता तसेच सहल व गणवेशासाठी 4 हजार रुपये अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी अधीक्षक, गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, रमा उद्यान, मेडिकल कॉलेज ग्राउंड शेजारी, मिरज येथे संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय महामार्ग 166 (एच) अंतर्गत पेठ ते सांगली रस्त्याचे निवाडे पूर्ण मोबदल्यासाठी संपर्क साधावा – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५-२६ आज मुंबईत ५१ ठिकाणी पार पडली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत 

vishwatmaklokswamivarta

अमरावती महानगरपालिका निवडणूक 2025-26 : झोन क्र.1 ते 7 येथे ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रियेला सुरुवात; मा.मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. भरत एन. बस्तेवाड, मा.निवडणूक निरीक्षक अनिल खंडागळे यांची पाहणी

प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन माझगाव डॉक येथे २७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

हिवरखेडे मका प्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई- मंत्री छगन भुजबळ