vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावती महानगरपालिका निवडणूक 2025-26 : झोन क्र.1 ते 7 येथे ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रियेला सुरुवात; मा.मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. भरत एन. बस्तेवाड, मा.निवडणूक निरीक्षक अनिल खंडागळे यांची पाहणी

अमरावती महानगरपालिका निवडणूक 2025-26 : झोन क्र.1 ते 7 येथे ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रियेला सुरुवात; मा.मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. भरत एन. बस्तेवाड, मा.निवडणूक निरीक्षक अनिल खंडागळे यांची पाहणी

राज्य प्रतिनिधी अमरावती- अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने झोन क्र.1 ते 7 येथे स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षामध्ये आज दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ई.व्ही.एम.) मधील बॅलेट युनिट (BU) व कंट्रोल युनिट (CU) यांची सिलींग प्रक्रिया अधिकृतरित्या सुरु करण्यात आली.    सदर सिलींग प्रक्रिया ही भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यंत काटेकोरपणे राबविण्यात आली. ई.व्ही.एम. यंत्रांची सुरक्षितता, गोपनीयता तसेच निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अबाधित राहावा, या दृष्टीने सर्व नियम व प्रक्रिया पाळण्यात आल्या.     या महत्वपूर्ण प्रसंगी मा. डॉ. भरत एन. बस्तेवाड (भा.प्र.से.), आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), नागपूर तथा मुख्य निवडणूक निरीक्षक व मा.अनिल खंडागळे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक यांनी सुरक्षा कक्षास भेट देऊन प्रत्यक्ष सिलींग प्रक्रियेची पाहणी केली. त्यांनी ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियमानुसार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया कोणत्याही त्रुटीशिवाय पार पाडण्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.     यावेळी संबंधित झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, कर्मचारी वर्ग, सुरक्षा यंत्रणा तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. सुरक्षा कक्षामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, 24 तास पोलीस बंदोबस्त व प्रवेश-नियंत्रण व्यवस्था ठेवण्यात आली असून ई.व्ही.एम. यंत्रांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे.   अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक ही मुक्त, निष्पक्ष व शांततेच्या वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासनामार्फत सर्व स्तरांवर आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने यावेळी करण्यात आले.

 

000000

संबंधित पोस्ट

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा रायगडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी

vishwatmaklokswamivarta

काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर-मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष…

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” प्रभावीपणे राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर नियोजनाबाबत विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta