vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

काश्मीर मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास रिपब्लिकन पक्ष सज्ज ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*काश्मीर मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास रिपब्लिकन पक्ष सज्ज ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

श्रीनगर प्रतिनिधी ~ जम्मू काश्मीर मधील गावागावात सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवा; काश्मीर मधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.काश्मीर च्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवून रिपब्लिकन पक्षाचे खाते उघडावे ; काश्मीर मध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.श्रीनगर मधील नवगाव येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ना.रामदास आठवले यांनी काश्मीर मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी सज्ज होण्याचे आवाहन केले.यावेळी रिपब्लिकन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाच्या संध्या गुप्ता; मंझूर अहमद; मुदस्सर अहमद लोण आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सरकारने जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटविल्यामुळे जम्मू काश्मीर ची प्रगती होत आहे.अनेक उद्योग जम्मू काश्मीर मध्ये येत असून येथील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे.भारतातील सर्व यात्रेकरूंनी जम्मू काश्मीर चे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जम्मू काश्मीर निर्भयपणे यावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले

येत्या नोव्हेंबर मध्ये काश्मीर मध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होत आहे.त्या सर्व निवडणुका रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढणार आहे.या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन श्रीनगर येथे करण्यात आले होते.त्यात ना.रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले.

 

0000

संबंधित पोस्ट

शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात दि. 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान साजरा होणार “जलमहोत्सव”

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा-महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी इंदोर एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेची विधानसभेत घोषणाआदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार· ५० लाख कुटुंबांना लाभ

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट

vishwatmaklokswamivarta

ई-पिक पाहणीसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन…

नशा विरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने दादर येथील आंदोलनात जोरदार मागणी वरळी म्युझिक कॉन्सर्टमधील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ‘सनबर्न’ व प्रशासन यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,‘सनबर्न फेस्टिव्हल’वर महाराष्ट्रात कायमची बंदी घाला…