vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*

*परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*

सातारा प्रतिनिधी- राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीकरीता विद्यार्थ्याकडून जाहिरातीव्दारे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत होती. याला मुदतवाढ देण्यात येत असून आता अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१५ पर्यंत ठेवण्यात आलेला आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमून्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास सादर करावीत. अधिक माहितीसाठी शासनाचे संकेतस्थळ “www.maharashtra.gov.in” येथील ताज्या घडामोडी या लिंकवर भेट द्यावी. या अगोदर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन राज्याचे समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार कराल तर होईल गुन्हा दाखल विद्यार्थी, पालक,शिक्षकआणि नागरिकांना इशारा -जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप  विमा भरण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ..

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा १६७० कोटींचा व्याज परतावा वितरीत*१.७७ लाख तरुणांना स्वयंरोजगाराची संधी

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते महारेशीम अभियानाची सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

कन्यादिन साजरा; पीसीपीएनडीटी, बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती मुलींच्या जन्माचे स्वागत करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आधार बायोमेट्रिक अद्यावतीकरण करण्याचे आवाहन