vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

खेलो इंडिया ट्रायबल गेम्स: 13 जानेवारीला अमरावतीत निवड चाचणी

खेलो इंडिया ट्रायबल गेम्स: 13 जानेवारीला अमरावतीत निवड चाचणी

अमरावती, प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार छत्तीसगड राज्यामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पहिली खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2025-26’ साठी महाराष्ट्र राज्यस्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेअंतर्गत फुटबॉल, हॉकी, आर्चरी, ॲथलेटिक्स, जलतरण, वेटलिफ्टिंग व कुस्ती या खेळांचा समावेश असून ही स्पर्धा खुल्या वयोगटात पार पडणार आहे. अमरावती येथील जिल्हा क्रीडा संकुल, तपोवन गेट येथे दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी आर्चरी, कुस्ती व वेटलिफ्टिंग या तीन खेळांच्या निवड चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

या राज्यस्तरीय निवड चाचणीमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी 12 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे उपस्थित राहून आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. सहभागी होणाऱ्या खेळाडूंना अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) आणि मूळ आधार कार्ड ही कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. या निवड चाचणीतून पात्र ठरणारे खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचणीसाठी पात्र ठरतील, ज्यातून अंतिम भारतीय ट्रायबल गेम्ससाठी संघाची निवड केली जाईल.

वैयक्तिक खेळ प्रकारात आर्चरीसाठी प्रथम 3, तर कुस्ती व वेटलिफ्टिंगसाठी प्रथम 2 खेळाडूंची निवड राष्ट्रीय चाचणीसाठी केली जाणार आहे. खेळाडूंनी स्वतःच्या खर्चाने व जोखमीवर या चाचणीत सहभागी व्हायचे असून, प्रशासनामार्फत केवळ निवास व भोजनाची व्यवस्था केली जाईल. तरी अमरावती विभागासह राज्यातील जास्तीत-जास्त अनुसूचित जमातीच्या खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी स्वप्नील चांदेकर (९४०४३७९६७७), श्रीमती त्रिवेणी चौधरी (९९७५५९०२३२) किंवा शेख सलीम (९६५७२७७४५७) यांच्याशी संपर्क साधावा.

00000

संबंधित पोस्ट

सरस्वती भुवन प्रशालामध्ये राज्य़ क्रीडा दिनाचे उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न*

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते उद्घाटन ..    महाराष्ट्रातून एकूण 400 खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांचा सहभाग 

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य मॅरेथॉनसह विविध कार्यक्रम

डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे खासदारांसोबत सायकल चालवली, नागरिकांना भारतात उत्पादित वस्तू विकत घेण्यासाठी केले प्रेरित आत्मनिर्भर व निरोगी भारताप्रति सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देत राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘गर्व से स्वदेशी’ या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला

vishwatmaklokswamivarta