vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिवरखेडे मका प्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई- मंत्री छगन भुजबळ

हिवरखेडे मका प्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई- मंत्री छगन भुजबळ

मुंबई, प्रतिनिधी: चांदवड तालुक्यातील हिवरखेडे खरेदी केंद्रावर परतालुक्यातील मका अनधिकृतपणे विक्री होत असल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.

या संदर्भात सदस्य राहुल आहेर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

त्यावर उत्तर देताना मंत्री भुजबळ म्हणाले की, केंद्र शासनाकडून सुरुवातीला ६ लाख ६० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानंतर राज्याच्या मागणीनुसार आणखी ५ लाख क्विंटलची परवानगी मिळून एकूण उद्दिष्ट ११ लाख ६० हजार क्विंटल झाले आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे ७ लाख ५० हजार क्विंटल मका खरेदी पूर्ण झाली असून सुमारे ११५ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

बारदान्याचा तुटवडा नसून काही संशयास्पद बाबी निदर्शनास आल्या आहेत. छाप्यात काही ठिकाणी गोण्यांचा साठा लपवून ठेवलेला आढळला असून महसूल अधिकाऱ्यांच्या तपासणीतही प्राथमिक तथ्य समोर आले आहे. या प्रकरणाची जबाबदारी संबंधित जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांवर निश्चित होत असल्याचे सांगून नाशिक येथील जिल्हा पणन अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात येईल. या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य संबंधित संस्था किंवा व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे# जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना दिले निवेदन…

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर बुरखा घालून येणाऱ्या महिला मतदारांची ओळख सन्मानपूर्वक आणि गोपनीयतेने पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था

vishwatmaklokswamivarta

आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिताअभ्यास गट गठीत करा-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची-त्रैमासिक सांख्यिकी (ER १) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण..

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा …कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta