vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खानापूर तालुक्यात अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या पदभरतीसाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

खानापूर तालुक्यात अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या

पदभरतीसाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 सांगली, प्रतिनिधी: एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, खानापूर विटा अंतर्गत अंगणवाडी सेविकांची 5 व अंगणवाडी मदतनीसांची 14 मानधनी पदे भरण्यात येणार असून, पात्र व स्थानिक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी 4 ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती खानापूर विटा येथे प्रत्यक्ष सादर करावेत. मुदत संपल्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

अंगणवाडी सेविका मानधनी पदभरतीसाठी मादळमुळी, गोरेवाडी, मोही, कमळापूर व पारे या गावात प्रत्येकी एक याप्रमाणे 5 रिक्त पदे आहेत.अंगणवाडी मदतनीस मानधनी पदभरतीसाठी वेजेगांव, माहुली, वाझर, पळशी, भिकवडी, कुर्ली, कार्वे, ऐनवाडी, धोंडगेवाडी, चिखलहोळ या गावात प्रत्येकी एक तर आळसंद व पारे या गावात प्रत्येकी दोन अशी एकूण 14 रिक्त पदे आहेत. ही मानधनी पदे भरण्यासाठी स्थानिक रहिवाशी व गुणवत्ताधारक पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय, खानापूर पंचायत समिती विटा येथे संपर्क साधावा.

00000

संबंधित पोस्ट

मकर संक्रांतीचे महत्त्व-   अध्यात्मिक वार्ता- 

vishwatmaklokswamivarta

मूल्य साखळी भागीदारीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी,सहकारी संस्थांनी अर्ज 

महात्म ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्याअध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे

माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश लागू…

vishwatmaklokswamivarta

शिवराज्याभिषेकपूर्व सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडाचा पायी मार्ग तीन दिवस बंद

कण्हेर धरण*धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा