vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जितेंद्र अग्रवाल यांची सतरावी फुल मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण

जितेंद्र अग्रवाल यांची सतरावी फुल मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण

जालना, प्रतिनिधी :

जालना शहरातील मॅरेथॉनपटू जितेंद्र अग्रवाल यांनी हैदराबाद येथे ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या एनएमडीसी मॅरेथॉन स्पर्धेत ४२.२ किलोमीटरची फुल मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्यांनी ही स्पर्धा ४ तास ४६ मिनिटांत पूर्ण केली असून, ४२ किलोमीटरची फुल मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करून आपल्या कारकिर्दीतील सतरावी फुल मॅरेथॉन पूर्ण करण्याचा उल्लेखनीय विक्रम नोंदविला आहे. एनएमडीसी मॅरेथॉन त्यांच्या आयुष्यातील सतरावी फुल मॅरेथॉन ठरली आहे.

  हैदराबाद येथील पीपल्स प्लाझा नेकलेस रोड येथून एनएमडीसी मॅरेथॉनला सुरुवात झाली. पुढे हुसेन सागर, केबीआर पार्क, दुर्गम्माचरू केबल ब्रिज, युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद आदी मार्गावरून धावत स्पर्धेची सांगता गच्चीबावली ॲथलेटिक्स स्टेडियम येथे करण्यात आली.

या स्पर्धेत सुमारे ३२ हजार भारतीय तर जवळपास १०० आंतरराष्ट्रीय धावपटूंनी विविध गटांत सहभाग नोंदविला. यामध्ये १० किलोमीटर, २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन तसेच ४२.२ किलोमीटरची फुल मॅरेथॉन अशा विविध अंतरांच्या स्पर्धांचा समावेश होता.

या मॅरेथॉन मार्गावर अनेक ठिकाणी फ्लायओव्हर असल्याने अनेक चढ-उतार होते त्यामुळे या धावपटूंची चांगलीच कसोटी लागली. त्यातच वाढलेली उष्णता आणि दमट हवामानामुळे धावपटूंना थकव्याचा सामना करावा लागला. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही अग्रवाल यांनी आपला वेग आणि संयम कायम ठेवत ४२.२ किलोमीटरचे अंतर निर्धारित वेळेत पूर्ण केले.

या स्पर्धेत अग्रवाल यांचा हा दुसरा सहभाग होता. विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांनी १७ फुल मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, विशेष म्हणजे आजवर त्यांनी सहभागी झालेली प्रत्येक फुल मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करत सर्वच्या सर्व स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. जालना शहरातून फुल मॅरेथॉनच्या क्षेत्रात सातत्याने सहभाग नोंदविणारे ते एकमेव धावपटू असल्याचे सांगण्यात येते. धावण्याच्या माध्यमातून आरोग्य, फिटनेस आणि सातत्याचा संदेश देणाऱ्या जितेंद्र अग्रवाल यांच्या या कामगिरीचे जालना शहरासह विविध स्तरांतून कौतुक होत आहे. प्रत्येक मॅरेथॉन पूर्ण करण्यामागे असलेली मेहनत, नियमित सराव, शिस्त आणि जिद्द यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यापुढेही देशातील विविध ठिकाणी होणाऱ्या फुल मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन हा प्रवास सुरू ठेवण्याचा मानस जितेंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडाप्रेमी, धावपटू आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

000

संबंधित पोस्ट

जिद्दीच्या जोरावर रंगला अंध मुलांचा क्रिकेट सामना रोमहर्षक स्पर्धेत टीम शिवनेरी संघाचा विजय- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्नमधील आणखी एक उपक्रम

नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीय शालेय “लॉन टेनिस” स्पर्धा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

संडे ऑन सायकल” मोहीमचे आयोजन

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

मिशन लक्षवेध अंतर्गत ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

जिल्हास्तरीय शालेय(मुले) फुटबॉल लिग स्पर्धा; 10 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित