तुमसे ना हो पयेगा’; ४७ हजार कोटींच्या घोषणेचा हिशेब द्या…! मराठवाड्याच्या विकासाच्या अनुशेषावर शिवसेनेचे जालन्यात लक्षवेधी आंदोलन- जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव
जालना, (प्रतिनिधी)- मराठवाड्याच्या विकासासाठी २०१६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४७ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेच्या तुलनेत प्रत्यक्षाततीन हजार कोटी रुपयांचीही विकासकामे झाली नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धवबाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी केला.मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष आणि सरकारच्या घोषणांचा जाबविचारण्यासाठी ‘तुमसे ना हो पयेगा’ या उपरोधिक घोषवाक्याखाली शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गांधी चमन येथे हे लक्षवेधीआंदोलन होणार असून, माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादासदानवे आंदोलनास उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात जालना येथूनहोत असून, १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशीछत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पक्षप्रमुख उद्धवठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची सांगता करण्यात येणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.२०१६ मध्ये मंत्री मंडळाची विशेष बैठक संभाजीनगर येथे मराठवाड्याचाअनुशेष भरून काढण्यासाठी ४७ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची घोषणाकरण्यात आली होती. मात्र, दहा वर्षांचा कालावधी उलटूनही अपेक्षित विकासझालेला नाही. जालना जिल्ह्यातील विविध विकासकामेही अद्याप प्रलंबित असून,
रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, ड्रायपोर्ट येथे पायाभूत सुविधांचाअनुशेष, अंबड येथील मत्स्योदरी मंदिर साठी ४० कोटी, अंबड येथीलपाणीपुरवठ्यासाठी ३५ कोटी तसेच जालना येथील १५ एमएलडी जलशुद्धीकरणासाठी५६ कोटी, जाफराबाद येथील पाणीपुरवठा साठी ४८ कोटी निम्न दुधनाप्रकल्पासाठी ७ कोटी ८५ लाख, आयटीआय साठी १० कोटी, स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय दगडाबाई शेळके यांच्या स्मारकासाठी ५ कोटी रुपये अशा विविधविकास कामांसाठी घोषणांचा पाऊस पाडला होता परंतु यातील एकाही कामपूर्णत्वाकडे नेले नाही असा आरोप देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत केला.जालना जिल्ह्यातील विकासकामांचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी शासनाने ठोसनिधी उपलब्ध करून देऊन कामे मार्गी लावावीत. केवळ घोषणांवर विकासाचागवगवा न करता प्रत्यक्षात किती कामे झाली, किती निधी खर्च झाला आणि कितीकामे अद्याप प्रलंबित आहेत, याचा हिशेब सरकारने जनतेसमोर मांडावा, अशी
मागणी श्रीवास्तव यांनी केली. यंदा मागील दीड महिन्यापासून पावसाने दडीमारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.आसमानी-सुलतानी संकटामुळे शेतकरी
हवालदिल झाला असून सोयाबीन, मका आणि ऊस या पिकांवरही परिणाम होण्याचीशक्यता आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्यांसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्या सोबतच जालना जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सरकारचे लक्ष वेधणे हा आंदोलनाचा प्रमुख उद्देश असल्याचेश्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात जास्तीत जास्त शिवसैनिकांनीसहभागी व्हावे तसेच सरकारच्या विरोधातील समविचारी पक्ष व संघटनांनीहीआंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव,महेशनळगे,जिल्हा संघटक भानुदास घुगे,उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ,भगवानकदम,हनुमान धांडे, माधवराव कदम,रमेश गव्हाड, परमेश्वर जगताप, अशोकआघाव,महिला आघाडी जिल्हा संघटक रूपम घुगे, शहरप्रमुख दीपक रणनवरे,महेशपुरोहित, तालुकाप्रमुख कैलास पुंगले,कुंडलिक मुट्ठे, दिनेश काकडे,गणेशदराडे, जयप्रकाश चव्हाण, रामेश्वर फंड,सुभाष राऊत,यांच्यासह युवासेनाजिल्हाधिकारी गणेश काळे यांनी केले आहे.