vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

रायगड प्रतिनिधी- राज्यातील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंकरिता करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी/विदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने “मिशन लक्ष्यवेध” या महत्त्वाकांशी योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतला असून “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी इच्छुक संस्थांनी दि.05 एप्रिल 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड राजेंद्र अतनुर, सुधीर मोरे सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंनी ऑलम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्याकरिता नियोजनबद्ध प्रयत्न होणे गरजेचे आहे. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या ऍथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉग टेनिस, रोइंग, शूटिंग, सेलिंग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती या 12 क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य देवून अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करावयाच्या दृष्टीने संबंधित अकादमी मधील खेळाडू, क्रीडामार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमींच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येऊन 35 ते 50 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था क वर्ग, 51 ते 75 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ब वर्ग 76 ते 100 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था अ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. अ वर्ग अकादमींना वार्षिक रुपये 30.00 लक्ष, ब वर्ग अकादमींना वार्षिक रुपये 20.00 लक्ष, क वर्ग अकादमींना वार्षिक रुपये 10.00 लक्ष आर्थिक सहाय्य, पायाभूत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उत्पन्न करणे, प्रशिक्षण मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे इ. बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे.

अधिक माहिती व अर्जाचे नमुन्यासाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क संदीप गुरव-9960702510.

०००००००

संबंधित पोस्ट

क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी२३ जूनपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावा गावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतुद- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या कन्येची हिमालयात ऐतिहासिक भरारी! डॉ. देविका पाटील ‘हिमालयन एक्स्ट्री सोलो’ पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ट्रायथलॉन…

जागतिक कौशल्य स्पर्धा नामांकनासाठी स्किल कॉम्पीटीशन

vishwatmaklokswamivarta

फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावणाऱ्या दिव्या देशमुखचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

🤼‍♂️ जागतिक कुस्ती मंचावर भारतीय युवा मल्ल सज्ज! ‘U-17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप’साठी भारतीय संघाची घोषणा…