vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

भारतीय क्रिकेट संघाचा न्युझीलंड क्रिकेट संघावर चित्तथरारक विजय,चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा दिमाखदार प्रवेश….

भारतीय क्रिकेट संघाचा न्युझीलंड क्रिकेट संघावर चित्तथरारक विजय,चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा दिमाखदार प्रवेश….

क्रिकेट प्रतिनिधी-

प्रथम फलंदाजी स्विकारणाऱ्या भारतीय संघाची सुरूवात थोडी अडखळत झाली असे वाटतं होते. कप्तान रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली लवकर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. धावफलक हलता ठेवत श्रेयस अय्यरने ७९, अक्षर पटेलने ४२ धावा करत भारतीय धावसंख्येला आकार दिला. त्यांना हार्दिक पांड्या, के.एल.राहुल, रवींद्र जाडेजा यांनी साजेशी साथ देत न्युझीलंड संघासमोर २५० धावांचे लक्ष ठेवले.

त्यानंतर गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने न्युझीलंड संघातील ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल अशा सर्वच भारतीय गोलंदाजांनी वरुणला योग्य साथ देत न्युझीलंड फलंदाजीवर योग्य अंकुश ठेवत टीम इंडियाला चित्तथरारक विजय मिळवून दिला.

भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीच्या लढतीकरता भारतीय क्रिकेट संघाला हार्दिक शुभेच्छा

संबंधित पोस्ट

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामधल्या २० जणांवर ८१ लाख रुपयांचं इनाम जाहीर होतं. 

शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

नवी मुंबईत शाळा प्रवेशोत्सव झाला आनंदोत्सव

मुंबई ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबईत ‘आयआयसीटी’ चा शुभारंभ; क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवे पर्व– केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा- कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायन-पनवेल महामार्गावरीलठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न..