vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मिशन लक्षवेध अंतर्गत ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

मिशन लक्षवेध अंतर्गत ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

जालना प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत “ मिशन लक्षवेध ” योजना ही धोरणात्मक योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत ॲथलेटिक्स़ या क्रीडा प्रकाराकरिता जिल्हा प्रतिभा विकास केंद्र जालना येथे स्थापन करणे प्रस्तावित आहे.

           जिल्हा प्रतिभा विकास निपुणता केंद्र कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने खेळाडू निवड चाचणीचे आयोजन करणे प्रस्तावित असून तूर्तास ॲथलेटिक्स़ या क्रीडा प्रकाराची खेळाडू निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे.

तरी दि.15 जुन 2026 रोजी पर्यंत सर्व पात्र खेळाडुनी खाली नमुद केलेले आवश्यक कागदपत्रे व अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी , कार्यालय जालना येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे.

खेळाडू निवड चाचणी दि 17 जुन 2026 रोजी घेण्यात येणार आहे. याकरीता निकष खालील प्रमाणे आहेत

ॲथलेटिक्स़ :- जिल्हा प्रतिभाविकास केंद्र निपुणता केंद्रस्तरावरील खेळाडु निकष

वयोमर्यादा 25 वर्षाआतील मुले /मुली (वर्षाच्या 31 डिसेंबर 2026 रोजी ). आवश्यक कागदपत्रे -जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ,अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड , मागील 02 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र , पासर्पार्ट साईज 03 फोटोग्राफ शाळा महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र पालकांचे संमती पत्र इ.

अधिवास- महाराष्ट्र राज्यातील खेळाडु असणे आवश्यक (अधिवास प्रमाणपत्र). क्रीडा कामगिरी-Top 3 Rank Players in AITA, National Ranking Player, राज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडु किंवा राष्ट्रीय स्तरवरील सहभागी खेळाडु (SGFI,AFI,Khelo India National Only ) गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यामापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती (Fitness)चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक. वैद्यकीय तपासणी- शासन मान्यता प्राप्त डॉक्टरांकडुन दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे.जिल्ह्यातील खेळाडुने निवडचाचणीसाठी सहभागी होण्याचे अहवान जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नरेंद्र पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे क्रीडा मार्गदर्शक, श्री.अशिष जोगदंड 8888346828 यांच्याशी संपर्क साधावा.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

दक्षिण कमांड सुवर्ण चषक 2025 – परंपरा व घोडेस्वारीतील उत्कृष्टतेचा उत्सव

राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा 2025-26 चे अमरावती येथे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पी.आर. जॅग्वार्सने पटकावला टीडब्ल्यूपीएल चषक-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण  

कोरिया इथं झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ८ सुवर्णासह एकूण २४ पदकांची कमाई.

खेळाच्या मैदानावरही पाकिस्तानला धूळ चारत भारतानं पटकावलं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद, पाच गडी राखून भारताचा दणदणीत विजय

vishwatmaklokswamivarta

क्रीडा प्रबोधिनी प्रवेश प्रक्रिया सुरू; खेळाडूंना प्रशिक्षणाची संधी…