vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

संडे ऑन सायकल” मोहीमचे आयोजन

संडे ऑन सायकल” मोहीमचे आयोजन

 

बुलडाणा, प्रतिनिधी. : क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय व जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत रविवार  रोजी सकाळी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे सायकल मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहीमेत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू, शारदा ज्ञानपीठ, सहकार विद्या मंदिर, एडे्ड हायस्कूल व बुलढाणाकरांनी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी “‍‍फिटनेस का डोस, आधा घंटा रोज” घोषणा देत तंदुरुस्तीचे संदेश देण्यात आले.खेलो इंडिया योजनेच्या फीट इंडीया उपक्रमातंर्गत व पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या आवाहनानुसार निरोगी राष्ट्राच्या उभारणीस नियमीत शारीरीक व्यायाम व खेळाचे महत्व जनतेला कळण्याच्या उद्देशाने “संडे ऑन सायकल” ही मोहीम देशभरात राबविण्याबाबत आले होते. या मोहीमेला बुलढाण्यातील जेष्ठ महिला तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.महानकर, क्रीडा अधिकारी आर. आर. धारपवार, महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे, क्रीडा अधिकारी एस. एस. केळे व राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जे. डब्ल्यू. मोहोड यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल मोहीमेला रवाना केले.

सायकल मोहीम जिल्हा क्रीडा संकुल- छत्रपती श्री. शिवाजी महाराज मंदिर- आय.टी.आय. रोड ते जिल्हा क्रीडा संकुल या मार्गाने सायकल मोहीमेचे आयोजन करण्यात आले. मोहीमे दरम्यान “‍फिटनेस का डोस, आधा घंटा रोज” या घोषवाक्याने सायकल मोहीमेची सुरुवात करण्यात आले. तसेच सायकल मोहिमेमधून नागरी वस्तीमध्ये शारीक तंदुरुस्ती महत्तवाची असल्याचे संदेश विद्यार्थ्यांकडून देण्यात आले. सायकल मोहिमेच्या आयोजनासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातील सर्व अधिकारी तसेच भीमराव पवार, कृष्णा नरोटे, सुहास राऊत, प्रेम सोनुने, अर्जुन राऊत यांनी सायकल मोहीमेचे यशस्वी आयोजन केले.

0000

संबंधित पोस्ट

एच आय व्ही संसर्गित रूग्णांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे,जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीत निर्देश

जालना शहर महानगरपालिका विषय समित्यांचे भाजपा उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

महाराष्ट्र शासनाचे ५, १३, २३ वर्ष मुदतीचे रोखे विक्रीस

सीमा सुरक्षा दलाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आणि भारताच्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त, बीएसएफच्या पहिल्या सर्व-महिला गिर्यारोहक पथकाने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर केले

समता पंधरवाडात विविध उपक्रमाचे आयोजन; सहभागी होण्याचे आवाहन

आज अहमदाबादमधील अपघातस्थळी प्रधानमंत्री यांनी भेट दिली.दृश्य हृदयद्रावक होते.बचाव व मदत कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची व टीमची भेट घेतली.ही दुर्घटना अकल्पनीय आहे.ज्यांनी आपले प्रियजन गमावले,त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta