vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

समता पंधरवाडात विविध उपक्रमाचे आयोजन; सहभागी होण्याचे आवाहन

समता पंधरवाडात विविध उपक्रमाचे आयोजन; सहभागी होण्याचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात समता पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवाडाचा मंगळवार दि. 8 एप्रिल रोजी समाजकल्याण कार्यालय येथील सामाजिक न्याय भवनात सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. पंधरवाडा कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमात सर्वांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले.

डॉ. अनिता राठोड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक जीवन व त्यांचे कार्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सामाजिक जीवनमान उंचावयाचे असेल तर प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजुन घेतले पाहिजे. हेच विचार आपल्याला सामाजिक जीवनात तारु शकतात. जिवनात बदल घडवु शकतात, असे प्रतिपादन डॉ. राठोड यांनी केले.

 सामाजिक सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून यामध्ये शाळा, महाविद्यालय स्तरावर प्रबोधन, मार्गदर्शन, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य, मनी मार्जीन योजनेअंतर्गत कार्यशाळा, मुलभुत अधिकार, कर्तव्ये या विषयी व्याख्याने, महीला मेळावा, जेष्ठांना मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, रक्तदान, संविधान जनजागृती, सच्छता अभियान, कर्मविर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा, गटई योजना अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यामातुन सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयन्त सप्ताहाच्या माध्यामातुन होणार आहे. या कार्यक्रमात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन संदीप कपले यांनी केले. त्यानंतर आश्विन हिवाळे यांनी प्रास्ताविकातून सप्ताहात कोणाकोणते उपक्रम राबविण्यात येणार आहे, याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी सर्व आर्थिक विकास महामंडळाचे कर्मचारी, वसतीगृहाचे विद्यार्थी, बार्टीचे समतादुत, तालुका समन्वय, सर्व कर्मचारी, स्वछतादुत, सुरक्षारक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. प्रमोद खनवे यांनी केले.

000000

संबंधित पोस्ट

मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रम्हे जिल्हा न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा

रायगड आणि आसपासच्या भागांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी …

vishwatmaklokswamivarta

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी अनुदान

पुढील वर्षी 15 लाख बेघरांना घरांच्या चाव्या सुपुर्त करणार येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • जून अखेर शेतकऱ्यांना कर्ज माफी ; नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान• आजपासूनच 12.35 पैसे दराने कांदा खरेदी सुरु प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या पाच लाख घरांचे उत्साहात लोकार्पण…

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानवडवळ नागनाथ येथे आयोजित समाधान शिबिराचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन▪️नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे, योजनांच्या लाभ पत्राचे वितरण 

आज दि.18 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवन येथे “स्वामित्व”योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रमाचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta