vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा कारागृहात वृक्षारोपणाने जागतिक पर्यावरण दिन साजरा

जिल्हा कारागृहात वृक्षारोपणाने जागतिक पर्यावरण दिन साजरा

बुलढाणा, प्रतिनिधी) : जिल्हा कारागृह व सामाजिक वनिकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन जिल्हा कारागृह परिसरात आंबा, सिताफळ, शेवगा, बांबु, तुळस अशा विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात कारागृह अधीक्षक संदिप भुतेकर व डीएफओ विपुल राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आली.

यावेळी वरिष्ठ तुरुंगाधिकारी मेघा बाहेकर, सहायक कृषी अधिकारी गजानन सांगळे, वनक्षेत्रपाल पी. आर. तोंडीलायता, वनपाल गजानन डोईफोडे, व्ही.एस. बकाल, ए.ए.गीते, आ. बी. नेवरे, वनरक्षक लक्ष्मी जाधव यांच्यासह कारागृहातील अधिकारी व कर्मचारी तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

०००

संबंधित पोस्ट

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात…बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदानाची नोंद झाली आहे.

vishwatmaklokswamivarta

भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-· भारतीय क्रिकेट संघाचे ऐतिहासिक विजयाबद्दल विधान परिषदेत अभिनंदन· भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने क्रिकेट जगतात देशाचा अलौकिक गौरव

मुंबईतील लालबागचा मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती येथून थेट गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या आपल्या वेबसाईट पोर्टलला आपल्या सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली ग्वाही- एनएबीएल टेस्टिंग लॅब प्रकल्पात अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन- उद्योगांना पीएनजी गॅस पुरवठ्याची कार्यवाही 15 दिवसात करण्याचे निर्देश

राज्यपालांकडून कर्मवीर भाऊराव पाटील सातारा विद्यापीठाचा आढावा

महसूल विभागाच्या सेवांसाठी आता ‘सुलभ सेवा’ व्हॉट्सॲप चॅटबॉट जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची संकल्पना