
बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात…बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदानाची नोंद झाली आहे.
राज्य प्रतिनिधी- बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात…बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदानाची नोंद झाली आहे.
बिहार : पहिल्या टप्प्यातील बिहार विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांतील १२१ मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावं यासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
दरभंगा : महिला मतदारांचा पुढाकार! 🗳️लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाचं प्रेरणादायी उदाहरण देत महिलांनी सकाळीच मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मतदान केलं.
बिहार निवडणुका 2025 : मुजफ्फरपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! मतदानासाठी आलेल्या नागरिकांचा रोप देऊन सन्मान करण्यात आले.
बिहार निवडणूक २०२५ | मुंगेरच्या तारापूरमध्ये मतदारांचा उत्साह! विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू असल्याने नागरिकांनी मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने रांगा लावल्या आहेत.
बिहार : पटना येथील ए.एन. कॉलेजमधील बूथ क्रमांक ४७ वर सध्या मॉक मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सकाळी ७ वाजता सुरू झाली आहे
पंतप्रधान @narendramodi यांनी #बिहार मधील मतदारांना पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत उत्साहाने सहभागी होण्याचं आवाहन केलं असून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांचे त्यांनी अभिनंदन केलं आहे
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार विजय कुमार सिन्हा यांनी लखीसराय मतदारसंघातून पहिल्या टप्प्यातील बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदानाची नोंद झाली आहे.



