vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा बुधवार दि.१८ रोजी

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा बुधवार दि.१८ रोजी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठीची विशेष सभा बुधवार दि.१८ मार्च २०२६ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय , छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत करण्यात आली आहे,असे पिठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी कळविले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठीचा कार्यक्रम याप्रमाणे-बुधवार दि.१८ रोजी सकाळी १० ते १२ नामनिर्देशन स्वीकारणे, दुपारी २ वा. विशेष सभेस सुरुवात, प्रथम प्राप्त नामनिर्देश पत्राची छाननी त्यानंतर नामनिर्देशन पत्र माघारीसाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी (मराठी वर्णाक्षर क्रमानुसार) तयार करण्यात येईल. त्यानंतर प्रथम अध्यक्षपदासाठी व नंतर उपाध्यक्षपदासाठी एका पेक्षा जास्त उमेदवार असतील तर हात वर करुन मतदान घेण्यात येईल. हात वर करुन मतदान करणाऱ्या सदस्यांची स्वाक्षरी घेऊन नोंद घेण्यात येईल, या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती यांना विशेष सभेस हजर राहण्यास कळविण्यात आले आहे. तथापि, सभापतींना मतदान करता येणार नाही. असे पिठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा;कार्यतत्पर राहून आरोग्य यंत्रणेने काम करावे – डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta

कॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी-पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी – चिंचवड महानगरपालिका हरित कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग कार्यक्रम

राखीच्या धाग्यातून स्वच्छतेचं आणि पर्यावरणाचं नातं!

हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ मोहीमांतून नवी मुंबईत स्वच्छतेसह आरोग्यावर भर

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार- मंत्री उदय सामंत

हिंदु विधिज्ञ परिषदेची राज्य शासनाकडे तक्रार !वक्फचे लाड बंद करा, वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का ?आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का?